Deccan Queen: पुणेकर आणि मुंबईकरांची लाईफलाईन! डेक्कन क्वीन झाली ९६ वर्षांची

Sakshi Sunil Jadhav

डेक्कन क्वीनचा ९६ वा वाढदिवस साजरा

पुणे रेल्वे स्थानकावर डेक्कन क्वीनच्या ९६ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Deccan Queen Turns 96

पुणे स्टेशनवर उत्साहाचे वातावरण

प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सकाळपासूनच रेल्वेप्रेमी, प्रवासी आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.

Deccan Queen Turns 96

बँड पथकाच्या वादनाने रंगत

वाढदिवसानिमित्त बँड पथकाने सादर केलेल्या सुरेल वादनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

Deccan Queen 96 years

केक कापून केला आनंदोत्सव

उपस्थित रेल्वेप्रेमी आणि प्रवाशांनी एकत्रितपणे केक कापून ‘दख्खनची राणी’चा वाढदिवस साजरा केला.

Deccan Queen 96 years

रेल्वे प्रवासी ग्रुपचा पुढाकार

या विशेष कार्यक्रमाचे नियोजन रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

Deccan Queen 96 years

मुंबई-पुणे प्रवाशांची गाडी

दररोज मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी डेक्कन क्वीन ही सर्वाधिक पसंतीची रेल्वे मानली जाते.

Deccan Queen 96 years

प्रवाशांचे भावनिक नाते

गेल्या अनेक दशकांपासून या गाडीशी प्रवाशांचे भावनिक आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.

Deccan Queen 96 years

वेळेच्या शिस्तीसाठी प्रसिद्ध

डेक्कन क्वीन ही वेळेचे काटेकोर पालन करणाऱ्या रेल्वेंपैकी एक म्हणून ओळखली जाते.

Deccan Queen 96 years

निर्धारित वेळेत मुंबईकडे रवाना

वाढदिवसाचा सोहळा पार पडल्यानंतर डेक्कन क्वीन सकाळी ७.१५ वाजता नियोजित वेळेनुसार मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

Deccan Queen 96 years

NEXT: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

money saving tips
येथे क्लिक करा