Goregaon Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : महिलांना खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी; टिक टॉक स्टारला अटक

सोशल माध्यमातून महिलांचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांकडून पैसे उकळणाऱ्या एका तरुणाला गोरेगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

मुंबई - सोशल माध्यमातून महिलांचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांकडून पैसे उकळणाऱ्या एका तरुणाला गोरेगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. गोरेगाव पोलिसांनी (Police) या आरोपीला आरे कॉलनीतून अटक (Arrest) केली असून हा तरुण महिलांना स्वतःची ओळख राजस्थानी शाही कुटुंबातील वारस अशी करून देत असे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजवीर सिंग याची गुन्हे करण्याची एक वेगळीच पद्धत होती. तो सोशल मध्यामत राजस्थानच्या महालातील स्वतःचे फोटो अपलोड करत असे. यानंतर तो महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल त्यातील अनेक महिला त्याला राजस्थानचा शाही वारस म्हणून त्याच्या मैत्रीची ऑफर स्वीकारत होत्या. यावर अनेक महिलांशी दोस्ती करून प्रेमाची बतावणी करून त्यांचे खाजगी फोटो मागत असे याच फोटोंचा वापर तो वसुली करण्यासाठी वापर करत असे. (Tik Tok Star Arrested)

गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणारी 30 वर्षीय तक्रारदार महिला या टिक टॉक स्टार च्या जाळ्यात फसली होती. आरोपीने तिच्याकडे देखील पैशाची मागणी केली. सुरुवातीला पिढी देणे त्याला चार लाख रुपये दिले. मात्र तो वारंवार पैसे मागू लागल्यानंतर पैसे न दिल्याने तो तिला फोटो सोशल माध्यमातून वायरल करण्याची धमकी देऊ लागला होता. यालाच कंटाळून महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

आरोपी विरोधात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी भादवि आणि आयटी अधिनियम चे विविध कलम लावून आरोपीला गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतून ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यामध्ये देखील मागील वर्षी आरोपी देवासी विरोधात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होऊन त्यात देखील त्याला अटक झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आला होता.

आरोपी हा राजस्थानचा राहणारा असून त्याचे इंस्टाग्राम अकाउंट झगमगते महल लक्झरी गाडी आणि अवतीभवती सुरक्षा गार्ड असल्याच्या फोटोंनी भरलेला आहे. आरोपीने आतापर्यंत 50 हून अधिक महिलांना ब्लॅकमेल करून पैसे वसूल केले आहेत. आरोपीला न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT