Team India: टीम इंडियातून आणखी एका दिग्गजाला नारळ, राहुल द्रविडसाठी होता स्पेशल

टी २० वर्ल्डकपमधील पराभव जिव्हारी लागला असून, बीसीसीआयनं आणखी एका दिग्गजाला नारळ दिला आहे.
Team India BCCI/ICC-Twitter
Team India BCCI/ICC-TwitterSAAM TV
Published On

Team India, BCCI Latest Update : टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाची सल अजून कायम आहे. बीसीसीआयनं कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं चेतन शर्मांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली होती. आता रिपोर्टनुसार, बीसीसीआयनं आणखी एका दिग्गजाला टीम इंडियातून कायमची 'सुट्टी' दिली आहे.

टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी काही खास राहिली नाही. सेमिफायनलपर्यंत पोहोचलेल्या टीम इंडियाला इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने चेतन शर्मांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली होती. हा बीसीसीआयनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Team India BCCI/ICC-Twitter
टीम इंडिया करणार पाकिस्तानचा दौरा, 15 वर्षानंतर असं का घडणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांचा करार नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेला आहे. त्यामुळे अप्टन हे बांगलादेश दौऱ्यावर टीम इंडियासोबत (Team India) नसतील. टी २० वर्ल्डकप स्पर्धा संपली. त्यावेळी अप्टन यांचा करारही संपुष्टात आला होता. दक्षिण आफ्रिकेतील पॅडी अप्टन हे हेड कोच राहुल द्रविड यांचे आवडते असल्याचे मानले जात होते. द्रविड यांच्या सल्ल्यानुसार ५३ वर्षीय अप्टन यांना मेंटल कंडिशनिंग म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. अप्टन हे यावर्षी जुलैमध्ये वेस्टइंडीज दौऱ्यापासून टीम इंडियात सहभागी झाले होते.

Team India BCCI/ICC-Twitter
Ind vs NZ : ३०६ धावा केल्या तरीही टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव, ही आहेत ३ कारणे

सुनील गावसकर यांनीही व्यक्त केली होती नाराजी

टी २० वर्ल्डकप दरम्यान भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही पॅडी अप्टन यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. इंग्लंडविरुद्ध सेमिफायनलमध्ये केएल राहुल अपयशी ठरल्यानंतर गावसकर यांनी अप्टन यांना सल्ला दिला होता. राहुलवर मेहनत घेण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com