Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मिठाईची ऑनलाईन ऑर्डर पडली महागात; महिलेची एक चूक अन् 2 लाख उडाले

तुम्ही जर ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल, तर वेळीच सावध व्हा.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Crime News : तुम्ही जर ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण, अंधेरीतील (Mumbai News) एका महिलेला ऑनलाईन मिठाई मागवणे चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन मिठाई मागवण्याच्या नांदात या महिलेला एका भामट्याने २ लाख ४० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

पूजा शाह असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. पूजा अंधेरीतील वीरा देसाई परिसरात राहतात. प्राप्त माहितीनुसार, त्यांनी मिठाईची ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी मोबाइलमध्ये एका स्वीट दुकानाचे नाव सर्च केले. त्यावरून त्यांनी एक हजार रुपयांची मिठाई खरेदी केली. मात्र पेमेंट होत नसल्याने त्यांनी अॅपवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.

समोरील व्यक्तीने तो मिठाईच्या दुकानातून बोलत असल्याचे सांगत महिलेची फसवणूक (Crime News) केली. त्याने बिलाची रक्क स्वीकारण्यासाठी त्यांच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक आणि मोबाईलवर आलेला ओटीपी महिलेकडून प्राप्त केला. पूजा यांनी वरील माहिती देताच, त्यांच्या क्रेडिट कार्डमधून लगेच त्यांच्या एकूण दोन लाख ४० हजार ३१० रुपये वजा झाले.

आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शाह यांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. पूजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत संबधित पेमेंट अॅपच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क केला.

पोलिसांनी पूजा यांच्या खात्यातून फसवणूक करत काढलेल्या रकमेपैकी दोन लाख २७ हजार २०५ रुपये फ्रीज़ केले. ही रक्कम शाह त्यांना परत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचे पैसे परत मिळाले. नागरिकांनी ऑनलाईन अॅपवरून पेमेंट करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT