Surabhi Jayashree Jagdish
पावसाळ्यात डासांची संख्या आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या आजारांची जोखीम दोन्ही वाढतात.
त्यापैकी एक अतिशय धोकादायक आणि जीवघेणा आजार म्हणजे डेंग्यू.
डेंग्यू पसरवणाऱ्या डासाचं नाव एडीज एजिप्टी आहे.
या डासांच्या शरीरावर आणि पायांवर काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात, ज्यामुळे ते झेब्रा सारखे दिसतात. हे डास साध्या डासांच्या तुलनेत थोडे छोटे व बारीक असतात.
हे डास दिवसा जास्त एक्टिव्ह असतात. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी. ह्याच वेळेत ते माणसांना जास्त चावतात.
डेंग्यूचे डास स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात वाढतात. जसं की, कूलर, फुलदाणी, जुने टायर इत्यादी.
घरात कुठेही पाणी साचू देऊ नका आणि शरीर पूर्ण झाकणारे कपडे परिधान करा. यामुळे डेंग्यूच्या डासांपासून संरक्षण मिळते.