Sanjay Nirupam : काँग्रेस नेते संजय निरुपम मुंबई पोलिसांच्या ताब्यात; काय आहे प्रकरण?

आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं ट्विट स्वत: संजय निरुपम यांनी केलं आहे.
Congress Sanjay Nirupam News
Congress Sanjay Nirupam NewsSaam TV
Published On

Sanjay Nirupam News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी खासदार तसेच काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं ट्विट स्वत: संजय निरुपम यांनी केलं आहे. पोलीस माझ्या घरात घुसले आणि मला जबरदस्तीने ताब्यात घेतलं. मला वर्सोवा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. हे पोलिसांचं गुंडाराज आहे, असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे. (Mumbai Latest News)

Congress Sanjay Nirupam News
Maharashtra Politics : बाळासाहेबांचं स्मारक सरकारने ताब्यात घ्यावं; भाजप आमदाराची मागणी

काय आहे प्रकरण?

उत्तर पश्चिम मुंबई (Mumbai News) लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. कीर्तिकर यांनी केलेला पक्षप्रवेश उत्तर पश्चिम मुंबईतील मतदारांचा अपमान असल्याने त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली.

या पार्श्वभूमीवर निरुपम यांनी आज मतदारसंघात बाईक रॅलीचं आयोजन केलं. आज म्हणजेच बुधवारी दुपारी 2 वाजता ही बाईक रॅली काढण्यात येणार होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी संजय निरुपम ताब्यात घेऊन वर्सोवा पोलीस ठाण्यात नेलं. तसेच त्यांना बाईक रॅली काढण्यास अटकाव करण्यात आला. (Maharashtra Political News)

दरम्यान, आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे. पोलीस माझ्या घरात घुसले आणि मला जबरदस्तीने ताब्यात घेतलं. मला वर्सोवा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. हे पोलिसांचं गुंडाराज आहे, असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.

'पोलिसांनी माझ्यावर दबाव टाकत कुठल्याही कागदपत्राशिवाय, कोणतीही पूर्वसूचना न देता मला घरातून जबरदस्तीने उचलून नेलं. घरात १० ते १५ पोलीस घुसले आणि मला जबरदस्तीने खेचून घेऊन गेले. मी काय करू शकतो? पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची आहे. आम्ही काही गुंड नाही. आम्ही राजकारणी आहोत', असं संजय निरुपम म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com