मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी भाजप आमदाराने एक मोठी मागणी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक राज्य सरकारने (Eknath Shinde) ताब्यात घ्यावं, अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. (Prasad Lad News Today)
इतकंच नाही तर, स्मारकाच्या देखभालीसाठी समिती स्थापन करून ठाकरे कुटुंबातील एखाद्या सदस्याची नेमणूक करावी, असा सल्लाही प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दिला आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड?
'बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक कुणाच्या वैयक्तिक कुटुंबाचं नाही. हे स्मारक महाराष्ट्राचं स्वाभिमान स्मारक व्हावं. त्यासाठी राज्य सरकारनं बाळासाहेबांचं स्मारक ताब्यात घ्यावं, स्मारकाची पूर्ण देखभाल सरकारनंच करावी', असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
'स्मारकाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचं काम महाराष्ट्रातच नाही तर देशात पोहोचवलं पाहिजे. ठाकरे कुटुंबीयांपैकी एक, दोन सदस्य समितीवर घ्यावेत', अशी मागणी सुद्धा प्रसाद लाड यांनी केली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.