Crime News saam tv
मुंबई/पुणे

रेल्वेत नोकरीच्या नावाखाली सुशिक्षित तरूणांना लाखोंचा गंडा; मुंबई पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या

रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Crime News : रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. सुशिक्षित बेरोजगारांना लाखोंचा चुना लावणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दहिसर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे मध्ये नोकरी लावण्याचा नावाखाली फसवणुकींच्या अनेक घटना घडल्या होत्या. पीडित मयुरी नावाच्या महिलेने रेल्वेत (Railway) टीसीची नोकरी लावण्याच्या नावाखाली आरोपी जितेंद्र यशवंत घाडी (25 ) यांनी 50 हजार रुपये घेतले.

मात्र अनेक महिने उलटून गेल्यानंतरही रेल्वेत नोकरी मिळाली नाही. वारंवार तगादा लावल्यानंतर आरोपी जितेंद्र यांनी रेल्वेचे एक जॉइनिंग लेटर दिले. मात्र, याची शहानिशा केली असता ते जॉइनिंग लेटर बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी जितेंद्र विरोधात मयुरी नावाच्या महिलेने जून 2022 मध्ये तक्रार दिली.

महिलेने तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी दहिसर पोलिसांनी पथके तयार करून तात्काळ कारवाईस सुरुवात केली. यावेळी आरोपी जितेंद्र घाडी हा मुंबई सेंट्रल येथील रेल्वे कारशेडमध्ये ऑफिस व्हायचं काम करत असल्याचं समजले येथूनच त्याला ही कल्पना सुचली असल्याचं तपासात पुढे आलं.

आरोपी जितेंद्र याने शेकडोहून अधिक बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याच्या नावाखाली फसवलं असल्याचं तपासात पुढे आला आहे. संदर्भात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये आरोपी विरोधात फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत.

आरोपीच्या मोबाईल लोकेशन नुसार त्याच्या घरचा पत्ता शोधून काढून त्याला कांदिवली येथून ताब्यात घेतलं. त्याच्या घरातून तीस ते चाळीस बोगस जॉइनिंग लेटर देखील जप्त करण्यात आली आहेत. याचा तपास दहिसर पोलीस करत आहेत.

पकडण्यात आलेल्या आरोपीने सांगितले की, त्याचा दुसरा साथीदार जितेन जगन्नाथ पंचागणे जो स्वतःला रेल्वेचा मोठा अधिकारी असल्याचे सांगून इच्छुक तरुणांकडून 80 ते 90 हजार रुपये घेत होता. यातील अवघे वीस टक्के इतकीच रक्कम आरोपी जितेंद्र याला मिळत होती, असेही तपासातून पुढे आले आहे.

दोन्हीही आरोपींनी मिळून आत्तापर्यंत 70 पेक्षा अधिक तरुणांना नोकरीच्या नावाखाली फसवले असल्याचं आढळून आले आहे. यातील 60 पेक्षा अधिक तरुणांना बोगस जॉइनिंग लेटर देखील देण्यात आले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT