पुणे हादरले! ब्लॅकमेल करत ५० वर्षीय महिलेवर तीन वर्ष अनैसर्गिक अत्याचार; चार्टर्ड अकाउंटंटच घृणास्पद कृत्य

पुण्यातील ५० वर्षीय महिलेवर सलग तीन वर्ष अनैसर्गिकरित्या बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Crime News
Crime Newssaam tv

Pune Crime News : पुण्यातून धक्कादायदक वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील ५० वर्षीय महिलेवर सलग तीन वर्ष अनैसर्गिकरित्या बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कोथरूडच्या चार्टर्ड अकाऊंटंट विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Crime News
Pune Crime News: हवेत गोळीबाराची आणखीन एक घटना; दहशत परवण्यासाठी तमा न बाळगता गोळीबार

अनिरुद्ध सतीश शेठ असं बलात्कार करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटच नाव आहे. या प्रकरणात अनिरुद्ध सतीश शेठ यांच्या कार्यालयामध्ये काम अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या महिलेने अनिरुद्ध सतीश शेठ विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

आपल्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलेला ब्लॅकमेल करत 2019 ते 2022 पर्यंत अनिरुद्ध सतीश शेठ यांनी पीडित मुलीवर महिलेवर वारंवार अनैसर्गिकरित्या बलात्कार केला आहे, असा आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.

येरवडा पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2019 मध्ये अनिरुद्ध शेठ यांनी पीडित महिलेला क्लाइंटला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने भुगाव येथे नेले. भुगाव येथील फ्लॅटवर गेल्यानंतर आरोपीने पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध देऊन फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या सर्व घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेबरोबर वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले, असा आरोप महिलेने तक्रारी केला आहे.

Crime News
Wardha News: धक्‍कादायक..घरात एकट्या असलेल्‍या दृष्टीहीन मुलीचा विनयभंग

मुंबई, पुणे आणि अलिबाग येथील हॉटेलमध्ये आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीत वेळोवेळी आरोपी अनिरुद्ध सतीश शेठ याने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध शेठ याने या महिलेसोबत पुन्हा जबरदस्ती करत याविषयी कोणाला सांगितल्यास पीडितेला आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने येरवडा पोलीस स्टेशन गाठत अनिरुद्ध सतीश शेठ विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com