Manasvi Choudhary
कॉटन किंवा सिल्क साडी असेल तर त्यावर तुम्ही शर्ट ट्राय करू शकता. शर्ट परिधान केल्यानंतर कमरेला बेल्ट लावून इंडोवेस्टर्न लूक दिसेल.
आजकाल ट्रेडिशनल ब्लाऊजऐवजी तुम्ही कॉर्सेट ब्लाऊज स्टाईल करू शकता. हा एक ग्लॅमरस लूक आहे.
अनेक सेलिब्रिटी आणि तरूण मुली आजकाल साडीवर ब्लाऊजऐवजी क्रॉप टॉप घालतात. ही युनिक स्टाईल तुम्हीदेखील ट्राय करू शकता.
साडीवर तुम्ही लाँग कुर्ती स्टाईल देखील करू शकता. अस्सल पारंपारिक लूक दिसेल.
साडी नेसण्याच्या अनेक स्टाईल आहेत. तुम्हाला युनिक आणि स्टायलिश लूक असेल तर तुम्ही टर्टलनेक टॉप घालू शकता.
तुम्हाला हटके आणि ग्लॅमरस लूक हवा असेल तर तुम्ही स्लिव्हलेस टॉप स्टाईल करू शकता.
अनेक सेलिब्रिटी साडी आणि जॅकेट असा लूक करतात. हा लूक तुम्ही खास ऑफिस मिटींग आणि वेडिंग लूकसाठी तुम्ही करू शकता.