सबस्क्रिप्शनवर आधारित असलेल्या पीहू ॲपवर अश्लिल व्हिडीओ चित्रीकरण आणि लाईव्ह-स्ट्रीमिंग केल्याबद्दल रविवारी वर्सोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली. यामध्ये ३ कलाकारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कलाकारांचे ओन्लीफॅन्स नावाचे एक प्लॅटफॉर्म आहे. येथे फॅन्सला एका लिंकमार्फत पैसे भरल्यानंतर अश्लिल व्हिडीओ पाहता येत होते.
वर्सोवा पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या आरोपींमध्ये २० आणि ३४ वर्षीय दोन महिलांसह २७ वर्षीय एका तरुणाचा समावेश आहे. या तिघांनी त्यांच्या फॅन्ससाठीच्या ॲपवर अश्लिल व्हिडीओ अपलोड केल्याचे आढळले आहे.
अंधेरी पश्चिम येथून अश्लिल व्हिडीओ बनवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांद्वारे मिळाली होती. त्यानंतर तपासात पुढे त्यांना ॲपबद्दलही माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अंधेरी पश्चिमेला असलेल्या चार बंगल्यांवर छापेमारी केली. त्यावेळी येथे असलेल्या तीन कलाकारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी म्हटलं आहे की, अटकेत असलेले तिघेही फक्त कलाकार आहे. आम्ही अद्यापही ॲपच्या मालकांचा शोध घेतोय. सदर ॲप गुगल प्ले स्टोअरसह ऍपल स्टोअरमधून काढून टाकण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.