Wardha Crime News: हिंगणघाटात थरार! जुन्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला, तरुणाचा जागीच मृत्यू

Hinganghat Crime News: हिंगणघाटात थरार! जुन्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला, तरुणाचा जागीच मृत्यू
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam Tv
Published On

>> चेतन व्यास

Hinganghat Crime News:

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे एक थरारक घटना घडली आहे. येथे एका जुन्या वादाचा वचपा काढत तरुणावर चौघांनी जीवघेणा हल्ला धावला आहे. या हल्ल्यात तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार करीत त्याची हत्या केल्याची घटना हिंगणघाट शहरातील शास्त्री वॉर्ड येथील किसन जिनिंग समोरील रात्री रस्त्यावर घडली.

याप्रकरणातील दोन आरोपींना शनिवारी रात्री तर, दोघांना आज अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. श्रीकांत उर्फ गजू श्रावण खंगार (३३ रा. मुजुमदार वॉर्ड) असे मृतकाचे नाव आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha Crime News
Manoj Jarange Patil: 'दगाफटका केला तर..', जरांगे पाटील यांनी सांगितला पुढचा प्लॅन

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक श्रीकांत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्यावर विविध प्रतिबंधात्मक कारवाई देखील पोलिसांकडून यापूर्वी करण्यात आल्या होत्या. काही महिन्यापूर्वी तो एका गंभीर गुन्ह्यातून तुरुंगातून बाहेर आला होता. मुजुमदार वाॅर्डातील गंगा माता मंदिर परिसरातील नागरिकांनाही तो त्रास द्यायचा.

शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आरोपी मयूर सदाशिव कोराटे (२५), बंटी उर्फ लाल्या गजानन खडसे (२४), सचिन छत्रीया (२०), प्रशांत उर्फ गोलू राऊत यांचा मृतक गजूसोबत वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन चौघाही आरोपींनी मृतक गजू याला दगडाने व कुऱ्हाडीने मारहाण करून त्याचे डोके ठेचले. यामध्ये श्रीकांत उर्फ गजू खंगार याचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Wardha Crime News
WRD Recruitment News: महाराष्ट्र जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी, पगार 1 लाख रुपयांपेक्षा जास्त, असा करा अर्ज

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली व मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com