Malvani Police station  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : शाळेच्या वॉचमनचा ४ वर्षीय चिमुकलीवर क्लासरुममध्येच अत्याचार; मालाडमधील घटनेने खळबळ, आरोपी अटकेत

Mumbai Crime News : आरोपी वॉचमनला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अन्सारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मालाडच्या मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथील ही धक्कादायक घटना आहे.

सूरज सावंत

Mumbai Crime News :

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ वर्षीय शाळकरी मुलीवर शाळेच्याच वॉचमनने लैगिंग अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मालाडच्या मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथील ही धक्कादायक घटना आहे. आरोपी वॉचमनला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अन्सारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सकाळच्या सुमारात आरोपी मोहम्मद अन्सारीने संधी साधून मुलीवर अत्याचार केला. १९ डिसेंबरच्या सकाळी ९ ते १२ दरम्यान ही घटना घडली. अल्पवयीन मुलीला एका क्लासरुममध्ये नेऊन हे गैरकृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra News)

घटनेनंतर वेदना असह्य झाल्याने मुलगी रडत होती. मुलीच्या पालकांनी तिच्या रडण्याचं कारण विचारलं. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यावेळी घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पालकांनी त्यानंतर मालाडच्या मालवणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीवरुन आरोपी मोहम्मद अन्सारी विरोधात ३७६, ३५४, भादवी कलमांतर ४, ८, १२ पोस्को अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT