Mumbai Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला संपवले; मुंबईच्या मालाड परिसरातील धक्कादायक घटना

Mumbai Crime News: मालाड ते जोगेश्वरी रेल्वे स्थानकादरम्यानच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेने पतीस दारू पिण्यास पैसे न दिल्याने दारुड्या पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Crime News In Marathi:

मुंबईच्या मालाडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड ते जोगेश्वरी रेल्वे स्थानकादरम्यानच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेने पतीस दारू पिण्यास पैसे न दिल्याने दारुड्या पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी सात तारखेला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या मालाडमध्ये पतीने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीने पैसे न दिल्यामुळे त्याने पत्नीला मारहाण केली.या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच मुंबई सोडून जाण्याचा प्रयत्न असतानाच बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चार तासातच आरोपीला अटक केली आहे. मोईनुद्दीन अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. परवीन अन्सारी असं मारहाणीत मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.

पश्चिम रेल्वे मार्गाच्या जोगेश्वरी ते मालाड दरम्यान असणाऱ्या रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्टीत आरोपी मोईनुद्दीन अन्सारी आणि परविन अन्सारी मागील अनेक वर्षापासून राहत होते. परविन अन्सारी हाती पडेल ते काम करून आपल्या पतीसोबत संसार करत होती. मात्र मोईनुद्दीन अन्सारी याला दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात सातत्याने वाद भांडणे होत असत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अन् पळ काढला

गुरुवारी देखील मोईनुद्दीन अंसारी याने आपल्या पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता तिने त्यास नकार दिल्याने त्याने तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाला होता यानंतर आरोपी अन्सारी याने घटनास्थळावरून पळ काढला.

बोरिवली जीआरपी पोलिसांना या घटनेसंबंधात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आल्यानंतर गुप्त माहिती दराने आरोपी पळून जाणार असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी आरोपीने चौकशी केली असता त्याने दारूसाठी पैसे न दिल्यामुळे पत्नीला मारहाण केली. या मारहाणीत मृत्यू झाल्याचे त्याने कबूल केले आहे. सध्या आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT