भाजपच्या माजी खासदाराच्या पुतण्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व भागात ही घटना घडली. या तरुणाने इमारतीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे अंधेरीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सागर रामकुमार गुप्ता (२३ वर्षे) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सागर गुप्ता अंधेरी पूर्वेकडील हरिदर्शन या इमारतीमध्ये राहत होता. याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सागरने आत्महत्या का केली यामगाचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
सागर रामकुमार गुप्ता हा उत्तर प्रदेशातील प्रतापगड या लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संगम लाल गुप्ता यांचा पुतण्या होता. सागर आपल्या कुटुंबीयांसोबत अंधेरी पूर्वेकडील आंबेवाडी येथील हरिदर्शन या एसआरए इमारतीत राहत होता. सागर कांदिवली पूर्वेकडील ठाकूर महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. मंगळवारी दुपारी महाविद्यालयातून घरी आल्यानंतर सागर हा कुटुंबियांसोबत काहीच बोलला नाही. घरात सर्वजण असताना तो अचानक इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेला. त्यानंतर त्याने सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली.
सोसायटी परिसरात काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने इमारतीतील अनेक जण बाहेर आले आणि त्यांनी जाऊन बघितले तर सागर गुप्ता हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सागरला रुग्णालयात नेले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी विलेपार्ले येथील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरा त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह गुप्ता कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सागरच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सध्या अंधेरी पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.