20 year old woman allegedly assaulted after film role promise AI Image
मुंबई/पुणे

सिनेमात रोल देण्याचं आमिष अन् भयानक कृत्य! २० वर्षांच्या तरुणीसोबत घडला हादरवणारा प्रकार; मुंबईतील 'त्या' गायकाचा खरा चेहरा समोर

Mumbai crime news : मुंबईत सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या व्यक्तीने ऑडिशनच्या नावाखाली तरुणीला जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याची तक्रार आहे.

Namdeo Kumbhar

20 year old woman allegedly assaulted after film role promise : चित्रपटात काम देण्याचे आणि बॉलिवूडमध्ये करिअर घडवून देण्याचे आमिष दाखवून एका २० वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या एका तथाकथित गायकाने तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली जाळ्यात ओढले. तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा धाराशिव येथील आनंद नगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. TOI ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या २० वर्षाच्या तरूणीची ऑगस्ट महिन्यात कांदिवली येथील आरोपी जतीन दोशीशी इंस्टाग्रामवर ओळख झाली . त्याने आपण चित्रपटसृष्टीतील गायक असल्याचा दावा केला. तसेच तिला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले, असा आरोप आहे. मुलीच्या तक्रारीनुसार, आरोपीने व्हिडिओ कॉलद्वारे ऑडिशन घेतली आणि नंतर चित्रपटातील भूमिकांसाठी बोल्ड दिसावे लागेल असे सांगून अर्ध-नग्न छायाचित्रे पाठवण्यास सांगितले.

१६ सप्टेंबर रोजी आरोपीने मुलीला बोरिवलीला बोलावले, तिच्या आधार कार्डमधील तपशील बदलले आणि नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये त्याने फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन मुलीवर कथितरित्या बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला इतर तीन पुरुषांना भेटायला सांगितले, असाही आरोप आहे. त्या महिलेने नकार दिला आणि ती धाराशिवकडे परत आली. नंतर दोशी आणि आनंद मुदलियार यांच्याकडून धमक्या मिळाल्यानंतर तिने नायगाव पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी दोशी, मिनाज रहमान, मुदलियार आणि ऋषभ दोशी यांच्या विरोधात बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण धाराशिव येथील आनंद नगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास कऱण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे ट्रॅकजवळच्या झोपड्या हटवणार; 3500 लोकांना घरे रिकामी करण्याची नोटीस, कुठे होणार कारवाई? VIDEO

ट्रेनमध्ये प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास वसूल करणार दंड, काय आहे नियम?

Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

SCROLL FOR NEXT