CLERK ARRESTED FOR ₹1.5 LAKH BRIBE IN JUNIOR COLLEGE APPROVAL CASE saam tv
मुंबई/पुणे

Bribe Case: मुंबईतील ज्युनियर कॉलेजच्या मंजुरीसाठी मागितली दीड लाखांची लाच; लिपिकाला ठोकल्या बेड्या, शिक्षण विभागात खळबळ

Anti-Corruption Bureau Action: ज्युनियर कॉलेजच्या वर्ग मंजुरीसाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून वरिष्ठ लिपिकाला अटक केली आहे. मुंबईच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने अटक केली आहे.

Bharat Jadhav

  • कनिष्ठ महाविद्यालय मंजुरीसाठी दीड लाखांची लाच मागितल्याचा आरोप.

  • मुंबईतील चर्नी रोड येथे एसीबीची कारवाई.

  • वरिष्ठ लिपिक राहुल शिंदे रंगेहात अटकेत.

नीट पेपर लीक प्रकरणात नव-नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पेपर लीक प्रकरणात शिक्षकांचा सहभाग उघड झाला आहे. त्याचदरम्यान शिक्षण क्षेत्रातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गांना मंजुरी देण्यासाठी एका लिपिकाने लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मुंबईतील चर्नी रोड येथे कारवाई करत लिपिकाला अटक केली आहे.

चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे शिक्षण विभागात वर्तुळात खळबळ उडाली आहे. राहुल विठ्ठल शिंदे असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका नामांकित शिक्षण संस्थेने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गांना मंजुरी मिळण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अर्ज केला होता.

सर्व नियम पाळूनही वर्ग मंजुरीची फाईल वरिष्ठ लिपिक राहुल शिंदे यांनी अडकून ठेवली होती. ही फाईल पुढे सरकवण्यासाठी आणि मान्यता मिळवून देण्यासाठी लिपिक शिंदे याने संस्थेच्या प्रतिनिधीकडे थेट दीड लाख रुपयांची मागणी केली. नियमानुसार काम होणार असतानाही पैशांची मागणी झाल्याने तक्रारदाराने लाच देण्याऐवजी ‘एसीबी’ कडे भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवली.

तक्रार मिळताच ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी गुप्तपणे या प्रकरणाची पडताळणी केली. शिंदे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच ‘एसीबी’च्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kito Diet: कीटो डाइट सुरू केल्यावर शरीरात काय होतं? फॅट बर्निंगपासून ब्लड शुगरपर्यंत जाणून घ्या ‘हे’ बदल

Maharashtra News Live Update: संजय राऊत म्हणजे बिनडोक - गोपीचंद पडळकर

LNG Train : गुजरातमधून धावली देशातील पहिली LNG ट्रेन; वैशिष्ट्ये पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

Skin Care: ग्लोईंग त्वचा हवी असेल तर सकाळी करा हे 3 स्किनकेअर उपाय; चेहऱ्यावर दिसेल नॅचरल शाईन

काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्यासह अनेकांनी पक्षाला ठोकला रामराम; सरकारवर गंभीर आरोप करत BRSमध्ये केला प्रवेश

SCROLL FOR NEXT