Pune : पोलीस दलात खळबळ! १.५ लाखांची लाच घेताना हवालदाराला रंगेहाथ पकडलं; कारवाईदरम्यान तक्रारदाराच्या छातीचा घेतला चावा

Pune Police Caught Red Handed Taking Bribe : पुण्यात एसीबीने मोठी कारवाई करत पोलिस हवालदाराला दीड लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. कारवाईदरम्यान आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत तक्रारदाराच्या छातीचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
PUNE POLICE HAVALDAR CAUGHT TAKING RS 1.5 LAKH BRIBE, ACB MAKES DRAMATIC ARREST
PUNE POLICE HAVALDAR CAUGHT TAKING RS 1.5 LAKH BRIBE, ACB MAKES DRAMATIC ARRESTSaam tv
Published On
Summary
  • पुण्यात पोलिस हवालदार गणेश कसपटे एसीबीच्या जाळ्यात

  • अजामीनपात्र वॉरंट थांबवण्यासाठी अडीच लाखांची मागणी

  • तडजोडीनंतर दीड लाख रुपये स्वीकारताना आरोपी रंगेहाथ पकडला

  • अटक टाळण्यासाठी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत तक्रारदाराला चावा घेतला.

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. एका हवालदाराने तब्बल दीड लाखांची लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. हैदराबाद न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट बजावू नये आणि संबंधित व्यक्तीला अटक टाळून मदत करावी यासाठी लाच मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवालदाराला रंगेहाथ पकडले. या कारवाईदरम्यान आरोपी हवालदाराने पळून जाण्याचा प्रयत्न करत तक्रारदाराच्या छातीचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. तसेच एसीबीच्या पथकासोबत धक्काबुक्कीही करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शहाजी कसपटे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीच्या मालकाविरुद्ध हैदराबाद न्यायालयात धनादेश न वटल्याप्रकरणी खटला सुरू आहे. या प्रकरणात न्यायालयाने संबंधित मालकाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट बजावण्यात येऊ नये आणि अटकेची कारवाई टाळण्यात मदत करावी, यासाठी हवालदार गणेश कसपटे याने सुरुवातीला अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

PUNE POLICE HAVALDAR CAUGHT TAKING RS 1.5 LAKH BRIBE, ACB MAKES DRAMATIC ARREST
Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

दरम्यान, संबंधित व्यक्तीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने केलेल्या पडताळणीत कसपटे याने तडजोडीअंती दीड लाख रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी बोट क्लब रस्त्यावरील एका सोसायटीसमोर सापळा रचला.

PUNE POLICE HAVALDAR CAUGHT TAKING RS 1.5 LAKH BRIBE, ACB MAKES DRAMATIC ARREST
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने कसपटे याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारवाईची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने तक्रारदाराच्या छातीचा चावा घेतला तसेच एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसीबीकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com