Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: जे जे रुग्णालयात तरुणीसोबत सफाई कामगाराचे संतापजनक कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News In Marathi: या प्रकरणी मुलीच्या आईने जे जे मार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सुरज सावंत

Mumbai Crime News:

मुंबईच्या जे जे रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जे जे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५ वर्षीय तरुणीचा सफाई कर्मचाऱ्याकडून गैरवर्तन करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने जे जे मार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगी आपल्या आईसोबत जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. रविवारी (8, सप्टेंबर) सायंकाळी पीडित मुलीची आई तिचे डायपर कचरा कुंडीत टाकण्यासाठी गेली होती.

हीच संधी साधून बेड साफ करण्याच्या बहाण्याने आरोपी सफाई कर्मचारी तेथे न बोलवता आला, व त्याने मुलीसोबत गैरवर्तन केले. या प्रकाराने घाबरुन गेलेल्या मुलीने याबाबतची माहिती डॉक्टरांना दिली.

या प्रकरणी मुलीच्या आईने जे जे मार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विरोधात कलम ३५४ भा द वीसह ८, १० पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच सफाई कर्मचारी आरोपी रोहिदास सोळंकी याला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सरकारी रुग्णालयात ह प्रकार घडल्याने रुग्णालयं तरी महिलांसाठी सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. (Latest marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's horoscope: शुक्रवार शुभ! श्रवण नक्षत्र आणि शुभ योगाचा संयोग; ‘या’ राशींचं भाग्य जबरदस्त चमकणार

Todays Horoscope: 'या' राशींसाठी दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; वाचा आजचं राशीभविष्य

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

SCROLL FOR NEXT