NCP Crisis: घड्याळ नक्की कुणाचे? सुप्रीम कोर्ट अन् निवडणूक आयोगासमोर आज 'राष्ट्रवादीची परीक्षा'

Sharad Pawar Vs Ajit Pawar: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी निवडणूक आयोग तसेच सुप्रीम कोर्टातही पार पडणार आहे.
Sharad Pawar Vs Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit PawarSaam Tv
Published On

प्रमोद जगताप, प्रतिनिधी

Maharashtra NCP Crisis:

राष्ट्रवादीतील संघर्षाचा आता न्यायालयीन लढा सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीची सुनावणी पार पडली. आज पुन्हा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी निवडणूक आयोगासमोर पार पडणार आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टातही आज राष्ट्रवादीची सुनावणी पार पडणार असून संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे.

साहेब की दादा, राष्ट्रवादी कुणाची?

एकीकडे निवडणूकआयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याची लढाई सुरू असतानाच सुप्रीम कोर्टातही (Supreme Court) शरद पवार गटाकडून याचिका दाखल करम्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी अपत्रतेची कारवाई करावी यासाठी ही याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना या आमदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र दिले मात्र त्यांनी आणखी कुठलीही कारवाई केली नाही. अध्यक्ष वेळखाऊ पणा करत आहेत म्हणून तुम्ही त्यांना कारवाईचे निर्देश द्या अस म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज कोर्टात होणार आहे.

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Saamana Editorial : कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून फडणवीसांची 'लायकी' काढली, 'सामना'तून टोलेबाजी

निवडणुक आयोगसमोर काय होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ चिन्ह कोणाचं याबाबतची लढाई निवडणूक आयोगात सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती त्यावर 6 तारखेपासून सुनावणीला सुरुवात झाली आहे. आज दुपारी 4 वाजल्यानंतर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे.

शुक्रवारी झालेल्या युक्तिवादात अजित पवार यांच्या गटाकडून ऍड मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली होती, आज पुन्हा अजित पवार गटाचा युक्तिवाद होईल. ऍड नीरज किशन कौल हे आज युक्तिवाद करतील. आज अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे. आजच्या युक्तिवादात कोणते मुद्दे उपस्थित केले जातात हे पाहाव लागेल. (Latest Marathi News)

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Manoj Jarange Patil: 'एकत्र राहा, सरकार आपल्यात फूट पाडेल...' नाशिकच्या सभेतून जरांगे पाटलांचे आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com