Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Saam TV

Saamana Editorial : कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून फडणवीसांची 'लायकी' काढली, 'सामना'तून टोलेबाजी

Political News : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.
Published on

Saamana Editorial :

देवेंद्र फडणवीस यांची कपॅसिटी असताना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले व कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून 'लायकी' काढली हे बरे नाही. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टोलेबाजी करण्यात आली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम नेते आहेत, त्यांनी केंद्रात काम करावं आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देतील, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil: 'एकत्र राहा, सरकार आपल्यात फूट पाडेल...' नाशिकच्या सभेतून जरांगे पाटलांचे आवाहन

याच वक्तव्यावरुन, फडणवीसांची कपॅसिटी आहे व ती कपॅसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाने ठरवले आहे खरे, पण या कपॅसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये? असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंदे गट म्हणतोय. मणिपूरपासून कश्मीरपर्यंत बरेच प्रश्न आहेत, चिनी सैन्यही देशाच्या सीमा भागांत घुसले आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेच. मोदी-शहा पूर्ण अपयशी ठरले आहेत. फक्त फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची कपॅसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. (Political News)

शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट यांनी सांगितले, 'फडणवीस यांचे काम उत्कृष्ट आहे, त्यांनी केंद्रात जावे.' फडणवीसांवर ही काय वेळ आली आहे? महाराष्ट्रातील यत्किंचित लोक त्यांना केंद्रात जाऊन काम करण्याचा सल्ला देत आहेत. फडणवीसांची लायकीच या प्रकरणात निघाली. फडणवीस हे अपमानाचा घोट गिळून महाराष्ट्रात दुय्यम स्थानी बसले आहेत. दोन-दोन उपवस्त्र दिल्लीने त्यांच्या उरावर बसविली आहेत. महाराष्ट्राची चारही बाजूंनी लूट सुरू आहे व फडणवीस हतबलतेने हे सर्व सहन करीत आहेत.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Shah Rukh khan News : शाहरुख खानला सरकारकडून Y+ सुरक्षा, ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनही सोबत असणार

विफलता व निराशा फडणवीसांच्या चेहऱ्यावर, वागण्या-बोलण्यात स्पष्ट दिसते. हे वातावरण असे आहे की, नागपुरात लोकसभा आणि विधानसभेत भारतीय जनता पक्ष पराभवाच्या छायेत स्पष्ट दिसतो आहे. लोकांच्या मनात संतापाचा लाव्हा उसळत आहे. शिंदे-पवार प्रकरणात भाजपची पुरती 'फजीहत' झाली असून फडणवीस यांच्या नेतृत्वाची चमक साफ उतरली आहे. त्यामुळे त्यांना केंद्रात तरी स्थान मिळेल काय? हा प्रश्नच आहे. फडणवीस चांगले काम करतात असा शिंदे गटाचा दावा आहे, पण दिल्लीत व केंद्रीय मंत्रिमंडळात आता कर्तबगार लोकांना स्थान राहिलेले नाही, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com