Mumbai Political News : भाजप मुंबईत लोकसभेच्या 4 जागा लढवणार, शिंदे गटाला 2 जागांवर समाधान मानावं लागणार?

Loksabha Election 2024 : भाजपकडे या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याविरोधात लढण्यासाठी तीन उमेदवार आहेत.
BJP vs Shivsena
BJP vs ShivsenaSaam TV
Published On

Mumbai News :

आगामी पहिली निवडणूक लोकसभेचीच होईल, अशीच काहीशी स्थिती सध्या आहे. त्यामुळे सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. भाजपनेही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

भाजपने शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या मुंबईत लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबईत लोकसभेच्या ४ जागा भाजप लढवणार असून शिंदे गटाला फक्त २ जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

BJP vs Shivsena
Saamana Editorial : कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून फडणवीसांची 'लायकी' काढली, 'सामना'तून टोलेबाजी

दक्षिण मुंबईतील लोकसभा मतदारसंघात शिंदेंकडे तगडा उमेदवार नसल्याने ही जागा भाजपला सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपकडे या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याविरोधात लढण्यासाठी तीन उमेदवार आहेत.

भाजपच्या या तीन उमेदवारांमध्ये विद्यमाना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि राज पुरोहित यांचे नाव चर्चेत आहे. (Political News)

BJP vs Shivsena
NCP Crisis: घड्याळ नक्की कुणाचे? सुप्रीम कोर्ट अन् निवडणूक आयोगासमोर आज 'राष्ट्रवादीची परीक्षा'

भाजपसाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही अतिमहत्वाची असल्याने एक-एक जागेवर भाजपकडून जातीने लक्ष घालून उमेदवार निवडले जाणार आहेत.

भाजपने तर या चारही लोकसभा मतदारसंघात कामे व मोर्चेबांधणीही सुरू केल्याचे कळते आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या दोनच जागा लढवणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com