Mumbai Latest Crime News, Bandra Police Station  SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : घृणास्पद! महिलेच्या घराबाहेर तरुणाचे अश्लील चाळे, CCTV मध्ये घटना कैद

Mumbai Latest Crime News : मुंबईतील वांद्रे येथील एका महिलेच्या घराच्या दाराबाहेरच तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

संजय गडदे

Mumbai Latest Crime News : मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. वांद्रे येथील एका महिलेच्या घराच्या दाराबाहेरच तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुरुवारी एका तरुणाला अटक केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथे ही घटना घडली आहे. विकृत तरुणाने एका महिलेच्या घराच्या दरवाजासमोरच हस्तमैथुन केलं. या प्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा वांद्रे परिसरातील बाजार रोड भागात राहणारा असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. (Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिमेकडील एका इमारतीत राहणाऱ्या महिलेच्या फ्लॅटच्या दरवाजाची कोणीतरी बेल वाजवली. त्या महिलेने आतील दरवाजा उघडण्यापूर्वी दरवाजाच्या पिन होल कॅमेरामधून समोरील व्यक्ती कोण आहे हे बघितले. बाहेरचं दृश्य बघून तिला धक्काच बसला. बाहेर उभा असणारा तरूण अश्लील चाळे करत असल्याचे दिसून आले.

हे दृश्य पाहून ती महिला प्रचंड गोंधळली आणि तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिने हा घडलेला प्रकार पोलिसांना कळवला. मात्र पोलीस येण्यापूर्वीच तो विकृत तरूण तिथून पसार झाला. यानंतर महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

Maharashtra Live News Update : विमानतळावर गरबा खेळला, पण गणपतीत ढोल-लेझीम वाजले नाहीत- राज ठाकरे

स्वकीयांकडून महाराष्ट्राचा घात; राज ठाकरेंचा अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून CM फडणवीसांना टोला

माजी उपराष्ट्रपतींची तब्येत बिघडली; दोन वेळा बेशुद्ध झाल्यानंतर थेट AIIMS मध्ये दाखल

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किन हवी असेल तर रोज रात्री चेहऱ्यावर लावा 'हे' जेल आठवड्याभरात मिळेल फरक

SCROLL FOR NEXT