Mumbai Crime Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: हेमा उपाध्याय- हरीश भंबानी दुहेरी हत्याकांड; चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेप

Hema Upadhyay And Haresh Bhambhani Death Case: दिंडोशी न्यायालयाने दुहेरी हत्याकांड या प्रकरणात कलाकार चिंतन उपाध्यायसह इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, प्रतिनिधी

Chintan Upadhyay News:

२०१५ मध्ये झालेल्या बहुचर्चित हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी हत्या प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिंडोशी न्यायालयाने या प्रकरणात कलाकार चिंतन उपाध्यायसह इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रसिद्ध शिल्पकार आणि फोटोग्राफर हेमा उपाध्याय (Hema Upadhyay) आणि कलाकार चिंतन उपाध्याय (Chintan Upadhyay) यांच्या घटस्फोटाचा खटला २०१५ मध्ये सुरू होता. या खटला सुरू असतानाच हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरिश भंबानी या दोघांचे मृतदेह कांदिवली परिसरात आढळले.

या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांडाचा तपास करत पोलिसांनी हेमा उपाध्याय यांचे पती चिंतन यानेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे पुरावे सादर केले होते. याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र सहा वर्षांनी २०२१ मध्ये त्याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला.

याप्रकरणी सरकारी वकिलांनी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. अखेर मंगळवारी याप्रकरणी न्यायालयाने चिंतन व इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या भयंकर हत्याकांडातील मुख्य मारेकरी विद्याधर राजभर हा अद्यापही फरार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून पहिला उमेदवार जाहीर

Sleep Effects: फक्त ५ ते ६ तास झोप होतेय? आताच सावध व्हा, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, वाचा नेमके काय होतात परिणाम

Famous Singer Video : ३० दिवसांत केलं १० किलो वजन कमी; प्रसिद्ध गायिका लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान स्टेजवर कोसळली

WhatsApp : WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं हे मिनिटांत समजेल, वाचा ट्रिक

Pune Sambhajinagar : पुणे-संभाजीनगर महामार्ग नकाशा फुटला, धनदांडग्यांकडून कवडीमोल दरात जमीन खरेदी

SCROLL FOR NEXT