Mahim Crime news Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: बाप नव्हे हा तर हैवान! दुसरं लग्न करता यावं म्हणून पोटच्या मुलालाच संपवलं; माहिमधील 'त्या' घटनेचा उलगडा

Mahim News: दुसऱ्या महिलेशी लग्न करता यावे म्हणून एका नराधम बापानेच आपल्या २ वर्षीय चिमुकल्याची गळा दाबून हत्या केलीये.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Crime News: मुंबईतल्या माहिम परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या महिलेशी लग्न करता यावे म्हणून एका नराधम बापानेच आपल्या २ वर्षीय चिमुकल्याची गळा दाबून हत्या केलीये. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला ताब्यात घेतलंय. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

रहमत अली अन्सारी (वय २२ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. शाहू नगर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी (१९ एप्रिल) पहाटेच्या सुमारास  माहिम येथील लिंक रोड परिसरात एका २ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आढळून आला होता.

प्लास्टिकच्या पिशवीमध्ये या मुलाचा मृतदेह गुंडाळून रस्त्यालगत टाकण्यात आला होता. या मुलाच्या तोंडाला फेस आला होता. तसंच त्याचे डोकं आणि उजव्या मनगटाला उंदरांनी चावा घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. (Breaking Marathi News)

या मुलाची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा पोलिसांना मृत मुलाचे नाव अन्सारी असल्याचं समजलं. पोलिसांनी या मुलाचे वडिल रहमत अली अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.

तेव्हा आपणच मुलाची हत्या केल्याचं त्याने चौकशीत कबूल केलं. आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबध होते. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र, पत्नी आणि मुलाचा त्याग करण्याची गळ या तरुणीने अन्सारी याच्याकडे घातली.

तेव्हा आरोपी रहमत अलीने २ वर्षाच्या मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलाला घराजवळील गोडाऊनमध्ये नेऊन गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर भा दं वि ३०२ (हत्या), २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि ३६४(अपहरण) कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Hair Care: हेल्दी आणि शायनी केस हवेत? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

Gold Price: मागच्या वर्षीचा सोन्याचा दर काय होता?

Bihar Election : निवडणकीआधीच मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; फायरब्रँड नेता पक्षाला रामराम ठोकणार

SCROLL FOR NEXT