Navi Mumbai Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Crime: अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूचा कारनामा, फार्म हाऊसवर बोलावलं, भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार

Navi Mumbai Crime: अशोक खरातनंतर मुंबईमधील एका भोंदूबाबाचा खतरनाक कारनामा उघड झाला आहे. या भोंदूबाबाने भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.

Priya More

Summary -

  • भोंदूबाबाने भूतप्रेताच्या नावाखाली महिलेला फसवलं

  • फार्महाऊसवर बोलावून वारंवार अत्याचार

  • अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलेवर बलात्कार केला

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला

संजय गडदे, मुंबई

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले. या प्रकरणानंतर राज्यभरातून एकापाठोपाठ एका भोंदूबाबाची प्रकरणं समोर येत आहेत. अशोक खरातनंतर मुंबईतील एका अशा भोंदूबाबाचा कारनामा समोर आला आहे ज्याने भूतप्रेत उतरवतो सांगून एक महिलेवर बलात्कार केला. भोंदूबाबाने या महिलेला योनीतील स्राव पाहिजे असे सांगून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई हादरली. महिलेने या भोंदूबाबाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

बाबाजान उर्फ अब्दुल रशीद असे या भोंदूबाबाचे नाव आहे. हा भोंदूबाबा नवी मुंबईतल्या कळंबोली येथे राहतो. त्याने मुंबईतल्या सांताक्रुझ येथे राहणाऱ्या महिलेची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला रायगडच्या महड येथील एका फार्म हाऊसवर बोलावून त्याठिकाणी भूतप्रेत उतरवतो सांगून तिच्यावर बलात्कार केला.

बाबाजान या भोंदूबाबाने या महिलेला सांगितले की, तुझ्या नवऱ्यावर त्याचंच स्पर्म वापरून काळीजादू करण्यात आली आहे. ही काळीजादू उतरवण्यासाठी तिच्या योनीतील स्राव हवं आहे. यासाठी या भोंदूबाबाने या महिलेला महड येथील फार्म हाऊसवर बोलावून घेतलं. त्याने भूतप्रेत उतरवतो असे सांगून या महिलेवर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर या महिलेच्या मुलीचे आजारपण हे देखील काळीजादू असल्याचं सांगून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

तसंच भूताने झपाटल्याने तुझं नवऱ्याशी भांडण होत आहे. तुझी मुलगी आजारी पडत आहे आणि तू पण आजारी पडशील असे सांगून त्याने या महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२४ या दरम्यान महाड, पनवेल, नवी मुंबई येथे बोलवून या भोंदूबाबाने या महिलेवर लैंगिक अत्याचार केले. या भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांनी पत्रक काढत समाजातील लोकांना सावध केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT