MUMBAI CRIME BRANCH ACTION AGAINST 10 FAKE DOCTORS; RS 2.20 LAKH MEDICINES SEIZED saam tv
मुंबई/पुणे

पदवी नाही, तरी थाटात प्रॅक्टिस; गुप्त रोगांवर उपचार करणाऱ्या १० बोगस डॉक्टरांना पोलिसांचा दणका

Mumbai Crime Branch Cracks Down On 10 Fake Doctors: मुंबईत वैद्यकीय पात्रता किंवा अधिकृत परवाना नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या १० बोगस डॉक्टरांवर गुन्हे शाखेने कारवाई केली. सात क्लिनिकवर छापे टाकून २.२० लाख रुपयांचे औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत परवाना नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या १० बोगस डॉक्टरांविरोधात मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. भांडुप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली आणि दहिसर परिसरातील सात क्लिनिकवर छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीची विविध प्रकारची औषधे आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.

गुन्हे शाखेच्या कक्ष-७ला मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींकडे वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक पात्रता नसतानाही ते रुग्णांवर उपचार करत होते. काही जण महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून प्रॅक्टिस करत असल्याचे कारवाईत आढळले. रुग्णांवर विविध आजारांसाठी अ‍ॅलोपॅथी तसेच आयुर्वेदिक आणि युनानी औषधोपचार केले जात असल्याचेही तपासात समोर आले. गुन्हे शाखेच्या पथकाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत भांडुपमधील संतोष हेल्थ क्लिनिक आणि विनायक हेल्थ क्लिनिक, जोगेश्वरीतील हमदर्द दवाखाना व कोहिनूर दवाखाना, बोरीवलीतील अंकुश आयुर्वेदिक दवाखाना, दहिसरमधील दीपक हर्बल हेल्थ केअर क्लिनिक तसेच मानखुर्दमधील समर आयुर्वेदिक दवाखाना येथे छापे टाकले.

या कारवाईदरम्यान विविध प्रकारच्या औषधांच्या बाटल्या, सिरिंज, अँटिबायोटिक टॅब्लेट्स तसेच इतर वैद्यकीय साहित्य असा सुमारे २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काही क्लिनिकमध्ये वैधता संपलेली आयुर्वेदिक व युनानी औषधे विक्रीसाठी ठेवल्याचेही आढळले.

या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, १९६१ मधील कलम ३३ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेच्या कक्ष-७मार्फत सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-७च्या पथकाने केली. कारवाईमुळे वैद्यकीय पात्रता नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे शाखेने कठोर पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी वडील सतिश सालियन यांची पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव

राज्यात १० टक्के पाणीकपात! शेतकऱ्यांसाठीही मोठा निर्णय; दिवाळीआधी मिळणार मदत?

Silk Saree For Womens: महिलांसाठी सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, हे 5 पॅटर्न्स तुम्हाला नक्की आवडतील

Kolhapur Fort : गड-किल्ल्यांच्या शौर्य गाथेतील मानाचा तुरा, कोल्हापूरमध्ये आजही दिमाखात उभा आहे 'हा' किल्ला

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसलेंनी दुसऱ्यांदा मारली बाजी

SCROLL FOR NEXT