Accused absconding from Worli police lockup saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: आरोपी शौचालयाला गेला आणि पुन्हा आलाच नाही, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: पोलिसांनी त्याच्याकडून ७ लाखांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिनेही जप्त केले होते.

Chandrakant Jagtap

>>सुरज सावंत

Mumbai Crime: मुंबईच्या वरळी पोलिसांच्या लॉकअपमधून आरोपी फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला नैसर्गिक विधीसाठी नेल्यानंतर त्याने शौचालयाच्या खिडकीच्या काचा काढून पळ काढल्याची घटना समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच या आरोपीला वरळीच्या जिजामाता नगर येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून ७ लाखांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिनेही जप्त केले होते. (Latest Marathi News)

आरोपी मूळचा गुजरातचा असून त्याच्यावर गुजरातसह नाशिक आणि इतर ठिकाणाही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. विशेष म्हणजे हा आरोपी इतका स्मार्ट आहे की जिथे चोरी करतो तिथे मागच्या चोरीतला मोबाइल ठेवतो. तसेच ओळख लपवण्यासाठी हा आरोपी स्वत:जवळ त्याचे कुठलेही कागदपत्र व ओळखपत्रही ठेवत नाही. (Crime News)

या आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याच्याबाबतची माहिती दिली होती. मात्र अवघ्या काही तासात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला आहे. या आरोपीच्या शोधासाठी आता वरळी पोलिसांचे पथक चार दिवसांपासून गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपविरोधात भूमिका घेतली, नेत्याची थेट पक्षातूनच हकालपट्टी, ६ वर्षांसाठी निलंबित

हिरोला टक्कर देणार होंडा! नवीन Shine 100 DX बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mrunal Thakur : अभिनयासाठी कॉलेज सोडलं, टीव्हीन तिला स्टार बनवलं, मृणाल ठाकूरच्या या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Bollywood Best Friend: तेरा यार हूँ मैं...; बॉलिवूडच्या ७ जिगरी मित्रांच्या जोड्या तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra Live News Update : सुरेश वरपुडकर जरी भाजप मध्ये गेले असले तरी परभणीतील काँग्रेस जागेवरच

SCROLL FOR NEXT