Mumbai Congress : आमचा हात मोडला, आता जोडायचं काम सुरुय; थोरातांच्या शाब्दिक कोटीवर पटोलेंचा कडक रिप्लाय

Mumbai Congress : नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आज काँग्रेसची बैठक आणि पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पटोले आणि थोरात पुन्हा एकत्र दिसले.
Nana Patole's strong reply to Balasaheb Thorat's comments
Nana Patole's strong reply to Balasaheb Thorat's comments saam tv
Published On

Mumbai Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून गटबाजी सुरू असल्याची चर्चा सुरू होती. एकीकडे प्रदेशाध्य नाना पटोले यांचा गट आणि दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा गट असल्याचे बोलले जात होते. मात्र आज काँग्रेसची बैठक आणि पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पटोले आणि थोरात पुन्हा एकत्र दिसले.

नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर या दोघांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र काँग्रेस एकसंघ असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी देखील सांगतिले होते की आमच्यात वाद नाही. भाजपचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न फोल ठरला. तसेच थोरातांनी कोणताही राजीनामा किंवा हायकमांडला पत्र पाठवले नव्हते, माध्यमांनी त्यांच्या भावना दुखवण्याचे काम केले असेही ते म्हणाले.

Nana Patole's strong reply to Balasaheb Thorat's comments
SSC HSC Exam: दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेत वेळ वाढवून मिळणार

थोराताच्या शाब्दिक कोटीवर पटोलेंचा कडक रिप्लाय

यावेळी बाळासाहेब थोरात शाब्दिक कोटी करत म्हणाले की, 'हाथ से हाथ जोडो' सुरू असताना आमचा हात मोडला. आता ते जोडायचे काम सुरू आहे. हे ते नाना पटोलेंकडे पाहून म्हणाले. त्यामुळे लोकांनी टाळ्या वाजवल्या. यानंतर पटोले यांनी देखील थोरातांच्या या शाब्दिक कोटीला कडक रिप्लाय दिला. 'बाळासाहेब मी असतो तर हात तुटला नसता, पण तुम्ही मला घेऊन गेले नाही. बाळासाहेब एकटे जाऊ नका, आम्ही सोबत आहोत', असे नाना पटोले म्हणाले. (Latest Marathi News)

काँग्रेस एकसंघ आहे - नाना पटोले

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस एकसंघ आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. राहुलजींनी सांगितलय की महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबर पक्ष व्हावा. आपण त्यासाठी काम करतोय. राहुलजी देशाचे पंतप्रधान व्हावे असे सर्व्हे येत आहेत. 'हाथ से हाथ जोडो' काम केले नाही तर मी पदारून कमी करीन अशी ताकीद यावेळी पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. (Maharashtra Congress)

Nana Patole's strong reply to Balasaheb Thorat's comments
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली, शरद पवारांवर बोलताना म्हणाले...

तसेच ज्यांना जबाबदारी दिली ते नेते बैठकीला येत नाही. जबाबदारी निभवत नाही. नाव आले नाही की फोन करतात. आपली पदं शोभेची नाही. पक्षाने संधी दिली त्याचे सोने करा. हे नाना पटोलेच्या घरचे काम नाही. काँग्रेसचे काम आहे. मला कारवाई करण्याची वेळ अनु देऊ नका, असा इशारा पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com