Mumbai Crime SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Best Bus Crime: बेस्ट बसमध्ये चढताना तरुणाचं तरुणीसोबत संतापजनक कृत्य, प्रवाशांनी शिकवला धडा

Man Touched Girl While Boarding Bus: अंधेरी पूर्वेकडील आगरकर चौकात बेस्ट बसमध्ये चढताना आरोपीने एका 26 वर्षीय तरुणीच्या शरीराला नको त्या ठिकाणी स्पर्श केला.

Chandrakant Jagtap

Latest Mumbai News: मुंबईच्या अंधेरी परिसरात बसमध्ये चढताना एका तरुणाने तरुणीला नको त्या जागी स्पर्श केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अंधेरी पूर्वेकडील आगरकर चौकात बेस्ट बसमध्ये चढताना आरोपीने एका 26 वर्षीय तरुणीच्या शरीराला नको त्या ठिकाणी स्पर्श केला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

लोकल ट्रेनमधील तरुणींच्या विनयभंगाची दोन प्रकरणं ताजी असतानाच मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील आगरकर चौकात बेस्ट बसमध्ये तरुणीसोबत हा संतापजनक प्रकार घडला आहे.

गर्दीचा फायदा घेऊन तरुणाने स्पर्श करताच तरुणीने त्याच्या कानशिलात लगावली. तरी देखील त्याने तिच्यासोबत वाद घातला. हा वाद सुरू असताना इतर प्रवासी आणि बेस्ट निरीक्षक यांनी त्या तरुणाला पकडून अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिले. शेख जहादुल इस्लाम अबुल बसर (४२ वर्षे ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. (Breaking News)

मिळालेल्या माहितीनुसार वसई एव्हरशाईन सिटी येथे राहणारी 26 वर्षीय तरुणी अंधेरी पूर्वेकडील एका कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करते. 11 जुलै रोजी ती नेहमीप्रमाणे ट्रेन पकडून अंधेरी येथे उतरल्यानंतर अंधेरी पूर्वेकडील आगरकर चौकात पावणे दहा वाजता बस पकडण्यासाठी उभी राहिली. (Latest Political News)

बेस्ट बसमध्ये चढण्यासाठी रांगेत उभे असताना अचानक तरुणीच्या पाठीमागून कोणीतरी तिच्या छातीला स्पर्श केल्याची जाणीव तिला झाली. मात्र गर्दीत चुकून कुणाचातरी धक्का लागला असावा असं समजून तिने दुर्लक्ष केले. मात्र आरोपीने बसमध्ये चढत असताना बगलेखालून हात घालून छातीला स्पर्श करून जोरात दाबले. तरुणीने पाठीमागे असलेल्या त्यात तरुणाचा कानाखाली वाजवल्यानंतर वाद-विवाद वाढला. यानंतर बेस्टचे निरीक्षक आणि प्रवासी यांनी आरोपी तरूणाला पकडून अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT