Bachchu Kadu Statement: तीन इंजिनचं सरकार कधीही कोसळू शकतं; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

Bachchu Kadu On Government: माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीन इंजिनचे सरकार कधीही कोसळू शकतं, असं वक्तव्य केलं आहे
Bacchu Kadu
Bacchu KaduSaam TV
Published On

Nagpur News: अजित पवारांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. अजित पवार गटाच्या एकूण ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेलं नाही. शपथविधीला दहा दिवस उलटूनही खातेवाटपाचा तिढा कायम आहे. याचदरम्यान, माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीन इंजिनचे सरकार कधीही कोसळू शकतं, असं मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

माजी मंत्री बच्चू कडू सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरात बच्चू कडू यांनी प्रसारमाधम्यांशी संवाद साधला. बच्चू कडू यांनी विविध मुद्दयावर मोठं भाष्य केलं. बच्चू कडू म्हणाले, 'मुंबईत राहीलं म्हणजे मंत्रिपद मिळते आणि गावी राहीलं म्हणजे मिळत नाही, असं काही नाही. मंत्री नसलो तरी काम करावं लागतं'.

Bacchu Kadu
Cabinet Expansion Formula: मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला! CM शिंदे आज मोठी घोषणा करणार? 'वर्षा'वर रात्री काय घडलं?

शिंदे सरकारच्या खातेवाटपावर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, 'सध्या खातेवाटपाचा गोंधळ सुरू आहे. आता इंजिनचं सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकार मजबूतही होऊ शकते किंवा त्यात बिघाडीही होऊ शकते. बिघाडा होऊ नये म्हणूनच बैठका सुरू आहे. कुणाला कोणतं खातं द्यायचं, कोणता जिल्हा द्यायचा असे प्रश्न आहेत. दिसायला सोपं आहे. पण आतून पोखरलेलं असू शकतं'.

'मला कुठल्याही पालकमंत्रिपदाची अपेक्षा नाही. मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही फोन नाही. आमदारांची नाराजी होणारंच शेवटी पद आहे. सगळीकडे आनंद नाही, विरोधी पक्षातही नाही. सत्ताधारी पक्षातही नाही, असे असे बच्चू कडू पुढे म्हणाले.

'अर्थखातं अजितदादांकडे जाऊ नये, अशी अनेक आमदारांची मागणी आहे. अजित पवारांना अर्थखातं देण्यालाही काहींचा विरोध आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आमदारांची नाराजी दूर करणे मोठं आव्हान असेल. कारण त्यातून नाराजीचा सूर उमटेल, असेही बच्चू कडू पुढे म्हणाले.

Bacchu Kadu
MNS Leader Extortion Case: मनसेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षाला पोलिसांच्या बेड्या, खंडणी प्रकरणात केली अटक

'बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण तिसरा आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रिपदे गेली आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या हातातला घास खाणारा राष्ट्रवादी पक्ष येथेही आला आहे. त्यामुळे ही नाराजी असणार आहे, असेही कडू पुढे म्हणाले.

'आमच्या गटातील आमदारांना अजित पवार हे अर्थमंत्री नको आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना निधीची पळवापळव केली म्हणून आम्ही इकडे आलो. त्यात अजित पवार यांची आमच्या मतदारसंघात बिलकुल ढळाढवळ बिलकुल सहन करणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

'तीन इंजिनचे सरकार आहे, हे सरकार मजबूत राहू शकतं आणि कधीही कोसळू शकतं. तिन्ही नेत्यांनी चांगल्या पद्धतीनं चालवले तर महायुती घट्ट होईल, असं सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com