>> सचिन कदम / संजय जाधव
MNS Raigad Vice President Sandeep Thakur Arrested: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर याला खंडणी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. दीड लाख रुपयांची खंडणी घेताना संदीप ठाकूरला पेण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
संदीप ठाकूरवर पेण तहसीलमधील सेतू कार्यालय सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्याने यासाठी धमकी देत 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती अशी माहिती समोर आली आहे.
एवढंच नाही तर संदीप ठाकूरने याधी चाकूचा धाक दाखवून 50 हजार रुपये घेतले आहेत असे देखील माहिती समोर येत आहे. डीवाय एसपी शिवाजी फडतरे आणि पेण पोलिस यांनी सापळा रचून संदीप ठाकूर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना अटक केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी संदीप ठाकूर याने फेसबुक लाईव्ह करून पेण सेतू कार्यालयातील गैरकारभार चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर त्याने खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. (Tajya Marathi Batmya)
मनसेने ट्रॅव्हल्स चालकांना शिकवला धडा
बुलढाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅव्हल्स चालकांना धडा शिकवला आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला होता. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर मनसेने आक्रमक होत प्रादेशिक परिवहन विभागास खाजगी बसमध्ये आग विझविण्यासंबंधीच्या यंत्रणा उपलब्ध करण्यासंदर्भात मागणी केली होती. (Latest Political News)
दरम्यान मंगळवारी मध्यरात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बुलढाणा येथील कार्यकर्त्यांनी चिखली येथे सुमारे १० खाजगी बस अडवून तपासणी केली. यावेळी ७ बसमध्ये संकटकालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नसल्याचे आढळून आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तेथे धाव घेतली आणि आपत्कालीन सुविधा नसलेल्या बसेसना दंड ठोठावण्यात आला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.