Maharashtra Rain Alert: राज्यात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांमध्ये बसरणार; IMD कडून अलर्ट जारी

Maharashtra Heavy Rain Alert: येत्या २४ तासांत विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
Maharashtra Heavy Rain Alert
Maharashtra Heavy Rain AlertSaam TV
Published On

Maharashtra Heavy Rain Alert: राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला असला, तरी कमी वेळेत पावसाने सरासरी गाठली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. अशातच हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

येत्या २४ तासांत विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. मागील एक-दोन दिवसांपासून कोकण आणि गोवा विभागात उकाडा जाणवत आहे. पण तापमानातील ही वाढ मर्यादीत असेल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

Maharashtra Heavy Rain Alert
Samruddhi Mahamarg Bus Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, भरधाव खासगी बस ट्रकला धडकली; थरकाप उडवणारी घटना

कोणकोणत्या जिल्ह्यांना इशारा

नाशिक, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Rain Alert) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, जुलै महिन्यात राज्यात सरासरीइतका पाऊस पडेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. राज्याच्या एका विभागात पडलेला अतिरिक्त पाऊस उर्वरित राज्याची पावसाची सरासरी (Maharashtra Rain) भरून काढेल, अशीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Maharashtra Heavy Rain Alert
Nashik Bus Accident: सप्तश्रृंगीगड घाटात ३५ प्रवाशांसह बस दरीत कोसळली; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTOS

उत्तर भारताता पावसाचा कहर!

सध्या उत्तर भारतात पावसानं थैमान घातलं असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखडं, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळं नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये अनेक पर्यटक अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आम्ही मनालीचा मार्ग खुला केला असून सुमारे 1000 वाहने निघाली आहेत. अडकलेल्या सर्वच पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com