Tragic Xerox Shop Owner Suicide In Nalasopara East Ambawadi Case Under Investigation Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबई हादरली! व्यवसायिकाची झेरॉक्स दुकानात गळफास घेत आत्महत्या

Mumbai Nalasopara Sucide News : नालासोपारा पूर्वेतील अंबावाडी परिसरात झेरॉक्स दुकानात ५० वर्षीय व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुळींज पोलीस तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • नालासोपारा पूर्वेतील अंबावाडी परिसरात धक्कादायक घटना

  • व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली

  • आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट

  • पोलीस तपास सुरू आहे

मनोज तांबे, मुंबई

Mumbai Nalasopara East Businessman Sucide नालासोपारा पूर्वेतील अंबावाडी परिसरात सोमवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. स्वतःच्या झेरॉक्स दुकानात गळफास घेऊन एका ५० वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यावसायिकाचे नाव बाबुलनाथ विश्वकर्मा (वय ५०) (Babulnath Vishwakarma) असे असून ते अंबावाडी येथील औंदुबर इमारतीमध्ये झेरॉक्स दुकान चालवत होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वीच दुकानात गळफास घेऊन जीवन संपवले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेपूर्वी काही दिवसांपासून बाबुलनाथ विश्वकर्मा यांचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झाला नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू होता. सोमवारी सायंकाळी शोधाशोध सुरू असतानाच दुकानातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले आणि ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तुळींज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली आहे. पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.दरम्यान या घटनेनंतर विश्वकर्मा यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi Temple: शिर्डीत साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ, कडक आणि बुरशी आलेल्या पेढ्यांची प्रसाद म्हणून विक्री

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल, या १२ मंत्र्यांचा पत्ता कट?

डोळ्याचं पारणं फेडणारं सौंदर्य! मुंबईतील 'या' ठिकाणी गेल्यानंतर मन होतं प्रसन्न

Maharashtra News Live Update : पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Gold Rate Today : सोनं 1.53 लाखांच्या पार, मुंबई-पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर किती? वाचा...

SCROLL FOR NEXT