Mumbai Crime News x
मुंबई/पुणे

Mumbai Crime : धक्कादायक! ३७ वर्षीय क्रिकेट कोचकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार

Mumbai : मुंबईच्या गोवंडी येथे एका क्रिकेट प्रशिक्षकाने १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी प्रशिक्षकाला अटक केली आहे. आरोपीवर याआधीही विनयभंगाचा आरोप होता.

Yash Shirke

  • मुंबईतील गोवंडी येथून धक्कादायक प्रकार समोर

  • ३७ वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाने १३ वर्षीय मुलीवर केले अत्याचार

  • प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Mumbai Crime News : मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका ३७ वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाने १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी देवनार पोलिसांनी क्रिकेट प्रशिक्षकाला अटक ताब्यात घेतले आहे. आरोपी याआधीही एका विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी होती. या एकूण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही घाटकोपरमध्ये तिच्या कुटुंबीयांसह राहते. ही १३ वर्षांची मुलगी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडजवळच्या गोवंडी परिसरातीला एका मैदानावर असलेल्या क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. क्रिकेट अकादमीमध्ये मुलीची आरोपी क्रिकेट प्रशिक्षकाशी ओळख झाली.

मे महिन्यामध्ये पीडित मुलगी आणि आरोपी प्रशिक्षक यांची मैत्री झाली. आरोपीने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मैत्री केल्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. २८ मे ते ४ ऑगस्ट या कालावधीमध्ये मुलीवर अत्याचार सुरु होते. वाढत्या लैंगिक छळाला कंटाळून मुलीने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबाला सांगितला.

पीडित मुलीच्या कुटुंबाने तातडीने पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर क्रिकेट प्रशिक्षकाला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा आधीपासूनच पोलिसांच्या रडारवर होता. २०२३ मध्ये त्याच पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातही तो आरोपी होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

Maharashtra Live News Update: धुळे जिल्ह्यासह जवळच्या जिल्ह्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Mumbai To Rajgad Travel: मुंबईपासून राजगड किल्ल्यापर्यंत प्रवास कसा करावा? ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल टिप्स जाणून घ्या

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT