Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News : १९ वर्षीय तरुणीकडून अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, घरी बोलावलं अन् जबरदस्ती...

Mumbai Crime News : मुंबईत १९ वर्षीय तरुणीने अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक शोषण केले. ब्लॅकमेल करून वारंवार गैरकृत्य केल्याचा आरोप. तरुणीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू.

Alisha Khedekar

  • १९ वर्षीय तरुणीवर अल्पवयीन विद्यार्थ्याचे शोषण केल्याचा आरोप

  • ब्लॅकमेल करून वारंवार गैरकृत्य केल्याची तक्रार

  • पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

  • मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणीने १० वीतील विद्यार्थ्याचे जबरदस्ती लैंगिक शोषण केले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तरुणीवर लहान मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीने धमकावत जबरदस्ती केल्याचा आरोप अल्पवयीन मुलाने केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गौरी शहा (बदलेल नाव) हिने २३ ऑगस्ट २०२४ रोजी घरात एकटी असल्याचे कारण देत पीडित अल्पवयीन मुलाला बोलावून घेतलं. यावेळी तिने आधी मुलाला तिच्यासोबत बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नसल्याचं पाहून तरुणीने जबरदस्तीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलाने तक्रारीत केला आहे.

धक्कादायक म्हणजे तरुणीने पहिल्या भेटीवरून ब्लॅकमेल करत नंतर, अनेक वेळा तिने अल्पवयीन मुलासोबत गैरकृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. नंतर मुलाने तिला टाळण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यावेळी तिने सोबत येण्यासाठी दबाव टाकत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर त्याच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्याअंतर्गत १९ वर्षीय आरोपी तरुणीवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मुलींसोबतच मुलांच्या सुरक्षिततेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT