Mumbai Police investigate ₹9.3 lakh honey trap sextortion case. 
मुंबई/पुणे

Honey Trap : व्हिडिओ कॉल केला अन् कपडे काढले... मुंबईतील नामांकित कॉलेजचा तरुण 'हनीट्रॅप'च्या जाळ्यात

Mumbai Honey Trap Case: मुंबईतील एका २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला सोशल मीडियावरून हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ₹९.३० लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Honey Trap Case Student Extorted Through Obscene Video Threats : सोशल मीडियावरील ओळखीतून एका २२ वर्षीय कॉलेज विद्यार्थ्याला 'हनीट्रॅप'च्या जाळ्यात अडकवून त्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ९ लाख ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगावातील बांगुरनगर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोन जणांविरुद्ध खंडणी, धमकी आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यांतर्गत बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा गोरेगाव परिसरात राहणारा २२ वर्षीय विद्यार्थी असून तो एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मार्च महिन्यात त्याची सोशल मीडियावर 'आहाना' नाव सांगणाऱ्या एका तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होऊन चॅटिंग सुरू झाले.

याच दरम्यान संबंधित तरुणीने विद्यार्थ्याला व्हिडिओ कॉल करून कपडे काढण्यास प्रवृत्त केले. तिच्यावर विश्वास ठेवून विद्यार्थ्याने स्वतःचे अश्लील व्हिडिओ पाठवले. त्यानंतर तरुणीने तिच्या साथीदाराच्या मदतीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी सुरू केली.

८ मार्च ते २५ जुलै २०२६ या कालावधीत बदनामीच्या भीतीने विद्यार्थ्याने ५५ वेळा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ९ लाख ३० हजार रुपये ट्रान्सफर केले. एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही आरोपींकडून खंडणीची मागणी सुरूच राहिल्याने, अखेर विद्यार्थ्याने बांगुरनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले, त्यांचा तपास सुरू असून संबंधित खातेदारांची माहितीही पोलिसांकडून मागवण्यात आली आहे. आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण अपघात! बस उलटल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग; BKC आणि सूरत स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात

Maharashtra News Live Update: मंत्री येणार म्हणून घाईघाईत काम, चाकण तळेगाव रोडवर एका तासातच कामाचा बोजवारा

LPG e-KYC Deadline: LPG e-KYC ची शेवटची तारिख डेटलाइन वाढणार का?

Tv Actress Puja Banerjee: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन; शेअर केला लेकीचा पहिला फोटो

SCROLL FOR NEXT