Mumbai Weather News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Weather News : मुंबई गारठली, येत्या तीन दिवसांत राज्यातील तापमानात होणार आणखी घट

रविवारी मुंबईत थंडीचा पारा हा 15 अंश खाली गेला तर ठाण्यामध्ये 16.2 अंश इतका होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र शीत लहर दिसून येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी मुंबईत थंडीचा पारा हा 15 अंश खाली गेला तर ठाण्यामध्ये 16.2 अंश इतका होता.

वाढलेल्या थंडीमुळे सर्वत्र धुक्यांची चादर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक वाढत्या थंडीसोबतच धुक्यांचा देखील आनंद लुटत आहेत.

त्यातच हिमालयतील बर्फवृष्टी आणि त्यातून उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट पुन्हा तीव्र झाल्याने पुढील दोन-तीन दिवस मुंबईतील हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे तसेच प्रामुख्याने मुंबईचे देखील तापमान आणखी उतरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बदलेल्या हवामानामुळे (Weather) मुंबईतील (Mumbai) तापमानात घट झाल्याने हवेचा दर्जा देखील खालावला आहे. मुंबईतील थंडीबरोबरच इतर राज्यातही गारवा कायम आहे. धुळ्यात थंडीचा जोर अद्याप कायम असून नागरिकांना देखील हुडहुडी भरली आहे.

धुळ्यात आज सकाळी सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे, कालच्या तुलनेमध्ये आज एक अंशाने तापमानात वाढ झाल्यामुळे धुळेकरांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे, परंतु हवेत गारवा अद्यापही मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे धुळेकरांना थंडीचा (Cold) सामना करावा लागत आहे, पुढील काही दिवस अद्यापही थंडीचा जो असाच प्रकारे कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आले आहे. नववर्षाची चाहूल लागण्यापूर्वी थंडीचा तडाखा राज्यभरात दिसून आला. आता हा पारा संक्रांतीनंतर पुन्हा दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

SCROLL FOR NEXT