Mumbai Coastal Road Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Coastal Road: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम वेगात; १० ठिकाणी इंटरचेंज; वाचा कुठून कसा असणार?

Versova Dahisar Mumbai Coastal Road Work Update: मुंबई कोस्टल रोडचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. दरम्यान, मुंबई कोस्टल रोडला जोडणारे १० इंटरचेंज तयार करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

मुंबईत कोस्टल रोड लवकरच सुरु होणार

१० ठिकाणी इंटरचेंज असणार

वाहतूक कोंडी कमी होणार

मुंबईत लवकरच कोस्टल रोड सुरु होणार आहे.कोस्टल रोडच्या उत्तरेकडील टप्प्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने काम सुरु केले आहे. आता वर्सोवा-दहिसरदरम्यान या कोस्टल रोडचा विस्तार होणार असून यामुळे वाहतूक कोंडी खूप कमी होणार आहे. एक्झिट जवळील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. हा कोस्टल रोड मुंबईतील १० महत्त्वाच्या मार्गांशी जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे.

मुंबईतील कोस्टला रोडचा पहिला टप्पा दक्षिण भागात आहे. यामळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी खूप कमी झाली आहे. मरिन ड्राइव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुल सुरु झाला असून हा वरळी सी लिंकजवळ समाप्त होतो. हा कोस्टल रोड १०.५८ किमी लांब आहे. यामुळे वरळी ते मरीन ड्राइव्ह फक्त १० ते १२ मिनिटांत जाता येणार आहे.याआधी ४० मिनिटे लागायचा.

कोस्टल रोडचा विस्तार मुंबई उत्तरेकडेही होणार आहे. वर्सोवा दहीसर कोस्टल रोड सुरु होणार आहे. यामुळे उत्तर ते दक्षिण असा मार्ग तयार होणार आहे. दरम्यान, पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंकिंग रोड आणि एसव्ही रोडवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा प्रवास सिग्नलमुक्त असणार आहे. परंतु एन्ट्री आणि एक्झिक्टला वाहतूक कोंडी होते.

आता कोस्टल रोडवरुन बाहेर पडण्यासाठी एक पर्याय मार्ग देण्यात येणार आहे. वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडला १० वेगवेगळ्या इंटरचेंजला जोडला जाणार आहे. यामुळे एन्ट्री आणि एक्झिटवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.जुहू विले पार्ले डेव्हलपमेंट स्कीम वरील उड्डाणपूल कोस्टल रोडला जोडला जाणार आहे.यानंतर वर्सोवा लिंक रोडला जोडण्यात येईल. वर्सोवा-मढ पुल लोखंडवाला इंटरचेंजजवळ कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT