Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

mns opposes missing link demands lonavala access : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील मिसिंग लिंकचं आज, १ मे रोजी लोकार्पण झालं. पण या मिसिंग लिंकला आता विरोध होऊ लागला आहे. मावळ तालुक्यातील मनसेकडून विरोध होत असून, गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

गोपाल मोटघरे, मावळ

MNS Opposes Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचं आज, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालं. आजपासून या मार्गावरील वाहतूक सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, लोकार्पणानंतर काही तासांतच मिसिंग लिंकला विरोध होऊ लागला आहे. मिसिंग लिंकसाठी मावळ तालुक्यातील भूमिपुत्रांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी गेल्या, मात्र याच मावळ तालुक्याला मिसिंग लिंकवर जाण्यासाठी सोयीस्कर प्रवेश नाही. लोणावळा परिसरातील नागरिकांना मिसिंग लिंकवर सोयीस्कर प्रवेश नसल्याने लोणावळा आणि मावळ तालुक्यासाठी काहीही फायद्याचा नाही. हा मिसिंग लिंक एक प्रकारे लोणावळा शहराचं पर्यटन कमी करण्याचा डाव आहे, असा आरोप मनसेने केला आहे.

राज्य सरकारला मिसिंग लिंक सुरू ठेवायचा असेल तर त्यांनी लोणावळा आणि परिसरातील नागरिकांना मिसिंग लिंकवर सोयीस्कर प्रवेश देणारा रस्ता कायमस्वरूपी तयार करून द्यावा, अशी मागणी मावळ तालुक्यातील मनसेने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com