Mumbai Coastal Road Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Coastal Road: मरीन ड्राइव्ह ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटांत, कोस्टल रोडचं आज उद्धघाटन

Rohini Gudaghe

Mumbai Costal Road News Updates: मुंबईकरांसाठी आज एक खुशखबर आहे. मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास आता अवघ्या १२ मिनिटांत पूर्ण होणार आहे. कारण कोस्टल रोडचं काम पूर्ण झालंय. त्याचं आज मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वांद्रे-वरळी सीलिंक आणि कोस्टल रोड जोडण्याचं काम आता पूर्ण झालंय. त्यामुळे आता मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्याला फक्त १२ मिनिटांत पोहोचता येणार आहे.

कोस्टल रोडचं आज उद्धघाटन

या कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी उद्घाटन होणार आहे. मुंबईमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. विविध प्रकल्पांचं काम देखील सुरू (Mumbai Coastal Road Inauguration) आहे. त्यापैकी कोस्टल रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातोय. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सीलिंकपर्यंत हा रोड आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किमी असून प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळतेय.

मरीन ड्राइव्ह ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटांत

या मार्गापैकी मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंत मार्ग मुंबईकरांसाठी सुरू झालाय. त्याची लांबी ६.२५ किमी (Mumbai Coastal Road) आहे. कोस्टल रोडचा पुढील टप्पा ४.५ किमी लांबीचा मार्ग वांद्रे-वरळी सीलिंकला जोडण्यात आलाय. यासाठी १३६ मीटरच्या मोठ्या बो-स्ट्रिंग आर्च गर्डरचा देखील वापर करण्यात आलाय. सुमारे दोन हजार मेट्रिक टन वजनाचा हा गर्डर आहे. त्याची बांधणी रायगड जिल्ह्यामधील न्हावा या ठिकाणी करण्यात आलीय. या मार्गाचे काम आता पूर्ण झालंय. त्यामुळे तो प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते लोकार्पण तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिपक केसरकर, तसेच मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.

काय फायदा होणार?

या मार्गामुळे वाहचालकांना मरीन ड्राइव्हवरून वांद्रयाला फक्त १२ मिनिटांत जाता येणार (Marine Drive to Bandra Distance) आहे. कोस्टल रोड आणि सीलिंक जोडल्यामुळे वेळ आणि इंधनाची होणार बचत होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास देखील मदत होणार आहे. दक्षिण मुंबईहून वांद्रयापर्यंतचा प्रवास वेगवान होणार असल्याची देखील माहिती (Mumbai News) मिळतेय. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ ७० टक्के आणि इंधनाची बचत ३४ टक्के होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT