Mumbai Coastal Road: कोस्टल रोड कसा आहे? कोणत्या वेळात करता येणार प्रवास? जाणून घ्या एका क्लिकवर
आवेश तांदळे, मुंबई
Mumbai Coastal Road Update :
मुंबईतील कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्ग या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या मार्गाचं सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. त्यानंतर १२ मार्चपासून सकाळी ८ वाजेपासून मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. या मार्गावर प्रवास करण्याचं वेळापत्रक देखील समोर आलं आहे. (Latest Marathi News)
कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा वरळी सी फेस परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौक, खान अब्दुल गफार खान मार्ग येथून किनारी रस्त्यावर प्रवेशासाठी मार्गिका आहे, त्या ठिकाणी हा समारंभ होणार आहे. कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलयाचं बोललं जात आहे.
या कोस्टड रोडमुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. या रोडचा पहिला टप्पा मुंबईच्या दक्षिणेला प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा मार्ग असा आहे. कोस्टल रोड वरळीकडून मरीन ड्राइव्हच्या दिशेने आता खुला करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मार्गिकेवरील प्रवासाची वेळ काय?
मुंबईतील कोस्टल रोडवर वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिकेवर आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस प्रवास करता येईल. या पाच दिवसात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वाहतुकीसाठी वेळ असणार आहे. तर शनिवारी आणि रविवारी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल.
कोस्टल रोडवरून उत्तरेकडे जाणाऱ्या बाजूची कामे व इतरही कामे सध्या सुरु आहेत. त्यामुळे ही कामे सुरु राहावीत. ते कामे वेळेत पूर्ण व्हावेत. यासाठी वाहतुकीच्या वेळा ठरवण्यात आल्या आहेत. या रोडवरून पीक अवर्समध्ये वाहतूक सुरु राहील, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.
कसा आहे संपूर्ण प्रकल्प?
कोस्टल रोड प्रकल्प एकूण १०.५८ किलोमीटर लांब आहे. या प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे.
जुळे बोगदे ठरणार आकर्षण
कोस्टल रोडमध्ये दक्षिण-उत्तर मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आले आहेत. या प्रकल्पात बोगद्यात सहा व इतर ठिकाणी ८ मार्गिका आहेत. तसेच सुमारे चार मजली इमारतीइतकी उंची, १२.१९ मीटर व्यास, ८ मीटर लांबी व तब्बल २८०० टन वजनाच्या टीबीएम संयंत्राचा उपयोग करण्यात आला आहे.
या बोगद्यांना तब्बल ३७५ मिमी जाडीचे काँक्रिटचे अस्तर करण्यात आले आहे. अग्नीप्रतिबंधक उपाययोजना म्हणून अत्याधुनिक फायरबोर्ड लावले आहेत. तसेच बोगद्यामध्ये अत्याधुनिक सकार्डो ही वायूविजन सिस्टिम आहे. याचबरोबर आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे देखील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.