Mumbai Central Railway Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Central Railway : मध्य रेल्वेचीच सेवा वारंवार का होते विस्कळीत, पश्चिम रेल्वेची का नाही? पाऊस नाही तर ही आहेत कारणं? वाचा सविस्तर

Mumbai Local Train Updates: मुंबईची मध्य रेल्वे पावसाळ्यात वारंवार विस्कळीत होत असते. पश्चिम रेल्वे मात्र सुरळीत सुरू असते. २५ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसात तर मध्य रेल्वे पूर्णपणे कोलमडून गेली होती.

Sandeep Gawade

Mumbai News Updates: मुंबईत २५ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला होता. या पावसात मध्य रेल्वे (CR) मार्गावरील रेल्वे सेवा अक्षरश: कोलमडून पडली होती. हजारो प्रवासी अडकून पडले होते. मात्र पश्चिम रेल्वे (WR) मार्गावरील सेवेला थोडा उशिर झाला तरी कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू होती. कित्येक वर्षांपासून मध्य रेल्वेवर पावसाळ्यात हा प्रकार नित्याचाच बनला आहे. थोडासा पाऊस झाला तरी व्यवस्था कोलमडते.. काय आहेत यामची कारणं? पश्चिम रेल्वे पेक्षा मध्य रेल्वेवरची या समस्या का? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..

मध्य रेल्वेचा मार्गचं समस्या तर नाही ना?

मध्य रेल्वेची सेवा पावसाळ्यात वारंवार कोलमडण्यामागे मुख्य कारण म्हणजे भौगोलिक स्थिती. मध्य रेल्वेचा मार्ग सखल भागातून जातो. या भागात मोठ्या प्रमाणात पाणी पावसाळ्यात पाणी साचतं. सायन, कुर्ला, आणि विद्याविहार यासारख्या भागात मोठ्या पावसात पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. पावसाचं पाणी रेल्वे ट्रॅकवर येतं त्यामुळे रेल्वेसेवा प्रभावित होते. त्यामानाने पश्चिम रेल्वे मार्ग उंच भागातून जातो, त्यामुळे पाणी साचण्याची समस्या उद्भवत नाही.

पाण्याचा निचरा का होत नाही?

मुंबईसारख्या समुद्र किनाऱ्यावर आणि तेही सखल भागात असलेल्या शहराच्या व्यवस्थापनात ड्रेनेज लाईन महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र मुंबईत मध्य रेल्वेच्या मार्गावर अपुरी आणि विस्कळीत ड्रेनेज सिस्टम आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. पावसात ही समस्या आणखी वाढते आणि पाणी ड्रेनेजमधून बाहेर येते आणि सखल भागात साचतं ज्याचा मध्य रेल्वेला फटका बसतो.

मध्य रेल्वेच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, “आम्ही फक्त १ टक्का ड्रेनेज व्यवस्थापनाचं काम करतो. तर ९८ टक्के बीएमसीच्या अधिकार क्षेत्रात येतं. ड्रेनेजमध्ये बेफाम कचरा साचतो आणि अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचतं.

दरम्यान, पश्चिम रेल्वेने गेल्या काही वर्षांमध्ये ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील ड्रेनेजमधून पाण्याचा अधिक निचरा होण्यासाठी सुधारणा केली आहे. त्यामुळे मोठ्या पावसातही पाणी साचत नाही.

पश्चिम रेल्वेकडे असं कोणतं तंत्रज्ञान आहे?

मध्य रेल्वेच्या जुन्या पायाभूत सुविधांमुळे ती अधिक व्यत्यय निर्माण करते. ट्रॅक, सिग्नल व्यवस्था आणि ड्रेनेज व्यवस्था यांची बहुधा दुरुस्ती आणि अद्ययावत करणे आवश्यक आहे. याउलट, पश्चिम रेल्वेला अधिक आधुनिक सुविधांमुळे फायदा झाला आहे. त्यांनी जलप्रलय टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान कार्यान्वयित केलं आहे, ज्यात पाणी साचणाऱ्या भागात ट्रॅक उंचावणे आणि पाण्याचा निचरा करणाऱ्या पंपांची कार्यक्षमता वाढवण्यात आली आहे.

मध्य रेल्वे काही उपयायोजा करणार की नाही?

मध्य रेल्वेकडे विविध समस्यांवर मात करण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत, पण हे एक दीर्घकालीन कार्य आहे. “मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे नूतनीकरण सुरू आहे. मात्र संपूर्ण यंत्रणा अद्ययावत करणे सोपं असणार नाही, असं रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. मध्य रेल्वेच्या भौगोलिक स्थानाता बदल करू शकत नाही, परंतु प्रत्येक मान्सून हंगामात समस्या करमी करण्यासाठी काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : बीडमध्ये शरद पवार की अजित पवार? कोणाचा उमेदवार मारणार बाजी? पाहा VIDEO

Bigg Boss 18: 'मेरी मर्जी...' म्हणत विवियन अन् अविनाशने घरात घातला धुमाकूळ, 'टाइम गॉड' दिग्विजयच्या तोंडचे पाणी पळाले

Sangli News : शाळगाव एमआयडीसीत कंपनीमध्ये वायू गळती; दोन महिलांचा मृत्यू

Maharashtra Exit Poll: दिंडोरीमधून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ होणार आमदार? पाहा Exit Poll

Dahisar Exit Poll : दहिसर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? घोसळकर भाजपला धक्का देणार का?

SCROLL FOR NEXT