Mumbai Local Block Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Mumbai Railway Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. भायखळा रेल्वे स्थानकावर गर्डर्स बसवण्यात येणार आहे.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. भायखळा स्थानकावर फुट ओव्हर ब्रिज गर्डर्स बसवण्यासाठी आणि शीव स्थानकावर सार्वजनिक पादचारी पूलाचे (फूट ओव्हर ब्रिज) गर्डर्स बसवण्याचे काम होणार आहे. त्यामुळे दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे भायखळा स्थानकावर फुट ओव्हर ब्रिजचे ४ स्टील गर्डर्स बसवण्यासाठी 110MT रोड क्रेन वापरण्यात येणार आहे. तर शीव रेल्वे ओव्हर ब्रिज येथे सार्वजनिक फुट ओव्हर ब्रिज चा ४० मीटर स्पॅन बसवण्यासाठी 250T रोड क्रेन वापरून हे काम केले जाणार आहे. त्यामुळेच शनिवारी आणि रविवारी रात्री दीड ते ४.३० वाजेपर्यंत हे ब्लॉक असणार आहे. यामुळे भायखळा ते परेलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचसोबत अप व डाउन धिम्या आणि जलद मार्गावर दादर आणि कुर्ला दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे.

ब्लॉकमुळे मेल/एक्सप्रेस गाड्यांवर होणारे परिणाम

मेल गाड्यांचे वेळापत्रक

ट्रेन क्रमांक 11020 (भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस) कुर्ला येथे ०३:२८ ते ०४:१५ तासांपर्यंत नियंत्रित केली जाईल आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेशन केली जाईल.

ट्रेन क्रमांक 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ठाणे येथे ०३:४३ ते ०४:०० तासांपर्यंत नियंत्रित केली जाईल आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेशन केली जाईल.

उपनगरीय लोकलवर होणारे परिणाम

दादर येथून २२.१८ वाजता सुटणारी दादर- कुर्ला लोकल रद्द राहील.

कल्याण येथून २३.१५ वाजता सुटणारी कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द राहील.

कसारा येथून २२.०० वाजता सुटणारी कसारा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ठाणे येथे २३.४९ वाजता शॉर्ट टर्मिनेट होईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२४ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -ठाणे लोकल रद्द राहील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.१९ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कसारा लोकल ठाणे येथून ०५.१४ वाजता शॉर्ट टर्मिनेट होईल.

ठाणे येथून ०४.०४ वाजता सुटणारी ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT