Dhanshri Shintre
दररोज लाखो भारतीय रेल्वेने प्रवास करतात, देशभरात लोकांची रेल्वे सेवा हा मुख्य आणि अत्यंत लोकप्रिय प्रवासाचा माध्यम आहे.
रेल्वेने प्रवास करणे हा सर्वात आरामदायक आणि सोयीस्कर माध्यम आहे, ज्यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने त्याचा उपयोग करतात.
परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का की एका ट्रेनची सेवा चालवण्यासाठी किती मोठा खर्च येतो आणि संसाधने वापरली जातात?
डिझेल इंजिन चालवण्यासाठी डिझेलवर मोठा खर्च येतो, तर इलेक्ट्रिक इंजिनसाठी वीज वापरावर जास्त खर्च होतो.
एका इलेक्ट्रिक ट्रेनसाठी प्रति किलोमीटर सुमारे १३० रुपयांचा खर्च येऊ शकतो, ज्यामध्ये वीज आणि देखभाल खर्च समाविष्ट आहे.
डिझेल ट्रेन चालवण्यासाठी प्रति किलोमीटर अंदाजे ३५० ते ४०० रुपये खर्च येतो, ज्यामध्ये इंधन आणि देखभाल खर्च समाविष्ट आहेत.
ट्रेन चालवताना ड्रायव्हर, गार्ड, स्टेशन स्टाफ, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांचे वेतन याही खर्चात समाविष्ट असते.
इंजिन, बोगी, चाके, ट्रॅक्शन आणि ब्रेकिंग सिस्टमची नियमित तपासणी व देखभाल करणे देखील खर्चात समाविष्ट असते.