Dhanshri Shintre
जगातील अनेक लोक त्यांच्या वाहतुकीसाठी ट्रेनवर अवलंबून आहेत, कारण ट्रेन प्रवास सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय आहे.
ट्रेनच्या शोधामुळे मानवी जीवन बदलले, त्यामुळे अनेकांना उत्सुकता होते की रेल्वे प्रवासाची सुरुवात कधी आणि कुठे झाली होती?
रेल्वे डब्यांना ओढण्यासाठी वाफेचे इंजिन वापरले जात असे; १८१४ मध्ये जॉर्ज स्टीफनसनने पहिले इंजिन बनवले, पण ट्रेन ओढू शकले नाही.
१८२४ मध्ये अभियंता रिचर्ड ट्रेविथिकने ट्रेन ओढण्यासाठी पहिले वाफेचे इंजिन यशस्वीरित्या चालवले.
सप्टेंबर १८२५ मध्ये, रिचर्ड ट्रेविथिकच्या स्टीम इंजिनने ६०० प्रवाशांसह ३८ रेल्वे डबे यशस्वीरित्या ओढले.
जगातील पहिली ट्रेन डार्लिंग्टन ते स्टॉकटन पर्यंत १४ मैल प्रति तास वेगाने प्रवास करत होती, असे सांगितले जाते.
लंडनमधील पहिल्या रेल्वे प्रवासाच्या यशानंतर, अनेक देशांनी आपले स्वतःचे रेल्वे इंजिन आणि डबे तयार करण्यास सुरुवात केली.
भारतामध्ये पहिली रेल्वे लाईन मुंबई ते ठाणे मार्गावर सुरू झाली. वृत्तानुसार, १६ एप्रिल १८५३ रोजी बोरी बंदरहून पहिली रेल्वे निघाली.
मुंबई आणि ठाणे दरम्यान पहिली ट्रेन धावल्याच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी होती. ट्रेन चालवण्यासाठी आवश्यक स्टीम इंजिन ब्रिटनमधून आयात केले गेले होते.
भारतात स्टीम लोकोमोटिव्हचे उत्पादन १८५६ मध्ये सुरू झाले. त्यानंतर भारतीय रेल्वे विकसित झाली आणि ती आज देशाची जीवनरेखा बनली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.