CENTRAL RAILWAY UPGRADES 10 LOCAL TRAIN SERVICES TO 15 COACHES, BIG RELIEF FOR MUMBAI COMMUTERS Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मध्य रेल्वेवर आजपासून धावणार १५ डब्यांच्या १० लोकल ट्रेन, वेळापत्रक आलं समोर

Mumbai Local Train Update News : आजपासून मध्य रेल्वेवर १० अतिरिक्त १५ डब्यांच्या लोकल धावणार. अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि कर्जत मार्गावरील लाखो प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील १० लोकल फेऱ्यांचे १२ डब्यांवरून १५ डब्यांमध्ये रूपांतर केले

  • अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि कर्जत मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा

  • १५ डब्यांच्या लोकलमुळे प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार

अजय दुधाने - अंबरनाथ

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज लाखो प्रवाशांचा प्रवास सुलभ केला असला तरी वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि कर्जत परिसरातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत आजपासून मुख्य मार्गावरील १२ डब्यांच्या १० लोकल फेऱ्यांचे १५ डब्यांमध्ये रूपांतर केले आहे.

१५ डब्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

या निर्णयामुळे सीएसएमटी ते अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जतदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. १५ डब्यांच्या लोकलमुळे प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार असून गर्दीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी १५ डब्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी करत होते. तब्बल सात वर्षांनंतर मध्य रेल्वेने या मागणीची दखल घेत फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आरामदायी प्रवास

सध्या मुख्य मार्गावर काही १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू असल्या तरी त्या तुलनेने कमी आहेत. वाढत्या गर्दीचा विचार करून आता १२ डब्यांच्या लोकलमध्ये तीन आणखी डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळेस प्रवाशांना प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

कसे असेल वेळापत्रक?

आजपासून सुरू झालेल्या नवीन 15 डब्यांच्या फेऱ्यांमध्ये डाउन मार्गावर सीएसएमटी-अंबरनाथ (सकाळी 9.15), सीएसएमटी-कल्याण (दुपारी 12.26), सीएसएमटी-बदलापूर (दुपारी 3.03), सीएसएमटी-कर्जत (सायंकाळी 6.21) आणि सीएसएमटी-अंबरनाथ (रात्री 11.08) या फेऱ्यांचा समावेश आहे. तर अप मार्गावर अंबरनाथ-सीएसएमटी (सकाळी 7.51), अंबरनाथ-सीएसएमटी (सकाळी 11.03), कल्याण-सीएसएमटी (दुपारी 1.36), बदलापूर-सीएसएमटी (सायंकाळी 4.47) आणि कर्जत-सीएसएमटी (रात्री 8.38) या फेऱ्या 15 डब्यांसह धावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Earthquake: मध्यरात्री पालघर भूकंपाने हादरले! तासाभरात भूकंपाचे दोन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Bhimashankar Temple: श्रावणात भाविकांना मोठा दिलासा; पाच महिन्यांनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पूर्णवेळ खुलं

Maharashtra News Live Update: पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज तिरंगा रॅलीचे आयोजन

आरोग्य विभागात तब्बल 89 लाखांचा घोळ, अधिकाऱ्याच तडकाफडकी निलंबन

Colombia earthquake: 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने कोलंबिया हादरलं; 111 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT