संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई: भायखळ्यातील शाम-ए-गरीबा मिरवणुकीत कथित विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी फैयाज निसार हुसेन प्रेमजी (वय 39) याच्या मोबाईल फोनच्या तपासात कथित देशविरोधी ई-मेल, तसेच इराण, इराक आणि ओमानमधील संपर्क क्रमांक आणि त्याने तयार केलेले अनेक आंतरराष्ट्रीय WhatsApp ग्रुप्स आढळल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या डिजिटल पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
भायखळा पोलिसांनी प्रेमजीला २७ जून रोजी अटक केली होती. त्याच्यावर झिंक फॉस्फाईड या अत्यंत विषारी उंदरांच्या विषाचा वापर करून तयार केलेल्या कॅप्सूल वेदनाशामक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांच्या नावाखाली मोफत वाटल्याचा आरोप आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तपासात हे विषारी रसायन दिल्लीतील एका कंपनीकडून खरेदी करण्यात आल्याचा संशय असून, त्यासाठी आर्थिक मदत कोणी केली आणि या कटामागे आणखी कोणी आहे का, याचाही तपास सुरू आहे. तसेच आरोपीची कृती दहशतवादी विचारसरणीने प्रेरित होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
२६ जून रोजी डोंगरीतील नूरबाग ते रे रोड येथील रहमताबाद कब्रस्तान दरम्यान निघालेल्या शाम-ए-गरीबा मिरवणुकीदरम्यान ही घटना घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात कलम १०९ आणि ११० चीही भर घालण्यात आली असून, सर्व संभाव्य दुव्यांचा सखोल तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.