Mumbra building slab collapse Saam tv
मुंबई/पुणे

Mumbra building slab collapse : मुंब्र्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

building slab collapse in Mumbra : मुंब्र्यात इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत ५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा येथून मोठी बातमी हाती आली आहे. मुंब्र्यातील एका इमारतीचा स्लॅब कोसळून एका ५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

ठाण्यातील मुंब्रा येथील जीवन बाग परिसरातील बानू टॉवरमधील तळ मजल्यावरील घरात स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या घरातील किचनमध्ये स्लॅब कोसळल्याची घनटना घडलीये. रविवारी सकाळी ८ वाजता घडलेल्या घटनेत उनेजा शेख नावाच्या ५ वर्षीय मुलगी जखमी झाली.

तर २३ वर्षीय उमर शेख, त्यांची पत्नी मुस्कान शेख आणि तिचा भाऊ एक वर्षीय इज्जान शेख हे किरकोळ जखमी झाले. या घटनेत जखमी झालेल्या ५ वर्षीय उनेजाला रुग्णालयाल दाखल केले. मात्र, उनेजाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पालिकेने ही इमारत सिल केली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघे जखमी झाले आहेत. तर एका मुलीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, घरातील किचनमधील स्लॅब कोसळल्याची घटना घडल्यानंतर मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तसेच कर्मचारी, सार्वजानिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

या इमारतीमध्ये एकूण २० घरे आणि ६ गाळे आहेत. ही इमारत सी २ बी प्रवर्गात होते. या इमारतीमधील संबंधित रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर सदरचं घर रिकामं करून सिल करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील कार्यवाही बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: बोलके डोळे अन् हसरं सौंदर्य, वैदेहीचे फोटो पाहून नजर लागेल

Maharashtra Live News Update:अंबरनाथ रेल्वे स्थानकात तिकीट खिडकीवर प्रवाशांना तिकीट नाकारले जात आहे.

Marathi Actress: बोलक्या डोळ्यांच्या या अभिनेत्रींना ओळखलं का? हे फोटो एकदा पाहा

Nashik Tourism : हिवाळ्यात ट्रेकिंग करायला आवडतं? मग 'हे' ठिकाण तुमच्यासाठी ठरेल बेस्ट

राज ठाकरेंनी ‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश परदेशीला सुनावलं; एकाच ठिकाणी राहा|VIDEO

SCROLL FOR NEXT