मुंबईतील महत्त्वाच्या उड्डाणपूलांपैकी एक शीव रेल्वे उड्डाणपूलाच्या जागी नवीन पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष हा पूल बंद राहणार असून वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने हा पूल उभारणार असून प्रकल्पाला ४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून २३ कोटी रुपये मध्य रेल्वे तर २६ कोटी रुपयांचा खर्च महानगरपालिका उचलणार आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थेने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये याची शिफारस केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला दरम्यानच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गात अडथळा निर्माण होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
२४ महिन्यांच्या आत हा पूल पाडून पुन्हा बांधण्याचा उद्देश आहे. दरम्यान २० जानेवारीपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. नवीन उड्डाणपूल 'सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स पद्धतीने उभारण्यात येणार आहे. पूलावर लांबी ४९ मीटर लांब आणि २९ मीटर रुंद असणार आहे. यासाठी आवश्यक ब्लॉक घेण्यात येणार असून त्याबाबत प्रवाशांना सूचना देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असतानाही सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र कल्याण डोंबिवली परिसरात दिसून येत आहे. यावर कल्याण पालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क प्रभाग व कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या पानाच्या टपऱ्या जेसीबीनेच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.